JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hruta Ajinkya: इंद्रा-दीपूच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! अंजिक्य हृताची जोडी पुन्हा एकत्र; शुटींगला सुरूवात

Hruta Ajinkya: इंद्रा-दीपूच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! अंजिक्य हृताची जोडी पुन्हा एकत्र; शुटींगला सुरूवात

प्रेक्षकांचे लाडके इंद्रा दीपू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोघांनी सिनेमाच्या शुटींगला सुरूवात केली आहे.

जाहिरात

हृता दुर्गुळे अजिंक्य राऊत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर: मन उडू उडू झालं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपलंस करणारी जाडी म्हणजे दीपू आणि इंद्रा . अभिनेत्री हृता दुर्गुळेनं साकारलेली दीपू आणि अभिनेता अजिंक्य राऊतनं साकारलेला अजिंक्य प्रेक्षकांना अक्षरश: डोक्यावर घेतला. दीपू आणि इंद्रा वेगळी फॅन फॉलोविंन या निमित्तानं पाहायला मिळते. मन उडू उडू झालं या मालिकेनं हृता आणि अंजिक्य ला प्रचंड प्रेम दिलं. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी इंद्रा दीपूची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहे. इंद्रा दीपूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे आणि ती ही मोठ्या पडद्यावर. हृता दुर्गुळे आणि अंजिक्य राऊत हे “कन्नी” या नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री हृताच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कन्नी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. हेही वाचा -  Sundara Manamadhe Bharali : लती अभ्याची लव्हस्टोरी हिट! मालिकेचे 700 भाग पूर्ण; पण अभ्याची गैरहजेरी सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आता काही दिवसातच सिनेमाच्या शुटींगलाही सुरूवात झाली आहे. लंडनमध्ये सिनेमाचं शुटींग सुरू झालं असून हृता आणि अजिंक्य लंडनमध्ये पोहोचले आहेत.

हृता आणि अंजिक्य यांची मालिकेच्या सेटवर फार चांगली मैत्री झाली. नुसतीच मैत्री नाही तर दोघांमध्ये अनोख नातं निर्माण झालं याविषयी दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मालिका संपल्यानंतर आता खूप दिवसांनी हृता आणि अजिंक्य थेट लंडनमध्ये भेटले आहेत. खरंतर हृता काही दिवसाआधीच लंडनला पोहोचली आहे. तर अजिंक्यचं लंडनमधील शुटींग उशिरा सुरू झालंय.

लंडनमध्ये दोघेही एकमेकांना भेटताच आनंद व्यक्त केलाय. हृतानं दोघांचा फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे. “फायनली आम्ही एकत्र फोटो क्लिक केलाय”, असं म्हणत हृतानं इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केलाय तर अजिंक्यनं, स्टोरी रिपोस्ट करत “मला खरंच आनंद झालाय. आमच्यातील मैत्री ही सोशल मीडिया किंवा कॅमेरासाठी नाही तर ही मैत्री मैत्रीच्या खऱ्या पातळीवरील आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे”, असं अजिंक्यनं म्हटलं आहे.

कन्नी या सिनेमात अभिनेत्री हृता आणि अजिंक्यबरोबर अभिनेता शुभंकर तावडे,ऋषी मनोहर, वल्लरी विजय हे कलाकारही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या