मुंबई, 28 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला इंडस्ट्रीतील सर्वात नम्र अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. सध्या अभिनेता आपल्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा जबरदस्त टीजर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीजर आल्यापासून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान हृतिक रोशन उपस्थित होता. यादरम्यान त्याला पाहून चाहते अक्षरशः वेडे झाले होते.चालू कार्यक्रमादरम्यान असं काही घडलं, ज्यामुळे सोशल मीडियावर हृतिकचं कौतुक होत आहे. प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हृतिक रोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक चक्क चाहत्यांच्या पायांना स्पर्श करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. त्याचा नम्र स्वभाव चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे. कार्यक्रमादरम्यान हृतिक स्टेजवर उभा असताना एक चाहता त्याच्याकडे येतो आणि त्याच्या पायाला स्पर्श करतो. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हृतिक अगदी साधेपणाने त्या चाहत्याच्या पायाला स्पर्श करतो. हे इतकं पटकन झालं की चाहत्यालासुद्धा नेमकं काय घडलं हे समजायला वेळ लागतो. नंतर चाहत्याने हृतिकला त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी दाखवलं. ते पाहिल्यानंतर हृतिकनं त्याला मिठी मारली आणि त्याच्यासोबत फोटोही काढला. इतकंच नव्हे तर हृतिकच्याने त्या चाहत्याला त्याच्या ‘HRX’ ब्रँडचा एक सुंदर हॅम्पर भेट म्हणून दिला.
(हे वाचा: Nawazuddin Siddiqui: ‘हड्डी’तील भूमिका साकारुन जाणवलं अभिनेत्रींचं दुःख; नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दिकी? **)** हृतिक रोशन लवकरच ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसणार आहे. पुष्कर-गायत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा पुष्कर-गायत्रीनेच केलं होतं. या चित्रपटात हृतिक रोशन एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.