JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अखेर बॉयफ्रेंडला सोडून घरी परतली हृतिकची बहीण सुनैना रोशन

अखेर बॉयफ्रेंडला सोडून घरी परतली हृतिकची बहीण सुनैना रोशन

सुनैना रोशननं वडील राकेश रोशन आणि भाऊ हृतिक रोशन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशन काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. आपल्या घरी राहण्या ऐवजी ती हॉटेलमध्ये राहत असल्याचंही बोललं जात होतं. तिच्या रिलेशनशिपचा तिच्या घरच्यांनी स्वीकार न केल्याचं म्हणत तिनं वडील राकेश रोशन आणि भाऊ हृतिक रोशन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. सुनैनाच्या मते तिचा बॉयफ्रेंड रुहैल हा मुस्लिम असल्यानं वडील आणि भाऊ त्याचा स्वीकार करत नाहीत. तसेच यावरुन तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा तसेच तिला कोंडून ठेवल्याचंही तिनं म्हटलं होतं. मात्र .यानंतर आता हे सर्व रुसवे-फुगवे विसरुन सुनैना आपल्या घरी परतली आहे. तसेच तिनं बॉयफ्रेंड रुहैल आमिनसोबत ब्रेकअप केल्याचंही बोललं जात आहे. सैफ अली खानच्या सवयीला वैतागली आहे करीना, लग्नानंतर 7 वर्षांनी केला खुलासा

स्पॉटबॉय-ईनं दिलल्या वृत्तानुसार सुनैना रोशन तिच्या बॉयफ्रेंडपासून वेगळी झाली असून सध्या ती तिच्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. एवढंच नाही तर ती वडील राकेश रोशन यांच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्येही सहभागी झाली होती. आपल्या बहीणीविषयी बोलताना हृतिक म्हणाला होता, हा आमच्या घरातील अत्यंत खासगी विषय आहे. माझी बहीण सध्या तिच्या आजारपणाशी लढत आहे. हे असं प्रत्येक घरात होतं मात्र मला याविषयी काहीही बोलायचं नाही. एका जाहिरातीसाठी घेतो 11 कोटी, पाहा कोण आहे ‘हा’ अभिनेता

सुनैनाच्या या प्रकरणाची सुरुवात कंगनी रणौतची बहिण रंगोली चंडेलनं केलेल्या एका ट्वीटवरुन झाली होती. या ट्वीटमध्ये सुनैनाचं कुटुंब तिला त्रास देत असून तिनं कंगनाकडे मदत मागितल्याचं रंगोलीनं म्हटलं होतं. याशिवाय सुनैनानं सुद्धा कंगनाला आपला खुला पाठिंबा दिला. होता ट्विटरवरील एका पोस्टमधून तिनं मी कंगनाला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं. रानू मंडलनं सलमान खानच्या गाजलेल्या सिनेमातलं गायलं गाणं, नवा VIDEO VIRAL ==================================================================== VIDEO: ‘लफडी केली तर सहन करा’; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या