JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हृतिक रोशनने रिक्षाचालकाच्या मुलाला दिले 3 लाख रुपये, पूर्ण करायचं होतं हे स्वप्न

हृतिक रोशनने रिक्षाचालकाच्या मुलाला दिले 3 लाख रुपये, पूर्ण करायचं होतं हे स्वप्न

अभिनेता हृतिक रोशनने (Hritik Roshan) एका रिक्षाचालकाच्या मुलाला आर्थिक मदत केली आहे. त्याचे एक खास स्वप्न पूर्ण करण्यासाठी हृतिकने त्याला ही मदत केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तो त्याच्या चाहत्यांबरोबर विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र सध्या तो एका अनोख्या कारणासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. हृतिकने एका रिक्षाचालकाच्या मुलाला आर्थिक मदत केली आहे. त्याचे एक खास स्वप्न पूर्ण करण्यासाठी हृतिकने त्याला ही मदत केली आहे. या 20 वर्षाच्या मुलाची मदत हृतिक HRX फिल्म्सच्या माध्यमातून केली आहे. रिक्षाचालकाच्या मुलाने याबाबत माहिती शेअर केली आहे. हृतिक रोशनने 20 वर्षांच्या कमल सिंहचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली मदत त्याच्यासाठी खूप मोलाची आहे. हिंदुस्तान टाइम्स ने याबाबत वृत्त दिले आहे. दिल्लीतील विकास पुरी याठिकाणी राहणाऱ्या रिक्षाचालकाचा मुलगा कमल याला हृतिकने 3 लाख रुपये दिले आहेत. Ballet डान्सर बनण्याचे या मुलाचे स्वप्न आहे, त्याकरता त्याला ‘द इंग्लिश बॅले स्कुल ऑफ लंडन’मध्ये शिक्षण घ्यायचे आहे. (हे वाचा- Bigg Boss 14 च्या धमाकेदार प्रमोशनला सुरुवात, पाहा सलमानचा BTS VIDEO ) याविषयी कमलने फंडरेजिंग प्लॅटफॉर्म केटोवर असे लिहले आहे की, ‘4 वर्षांपूर्वी मी Ballet बाबत ऐकले होते. माझे वडील ई-रिक्षाचालक आहेत आणि मी स्थानिक सरकारी शाळांमधून शिक्षण घेतले आहे. माझी नेहमी इच्छा होती पण डान्स क्लासला जाण्यासाठी पैसे नव्हते.’ या पोस्टमध्ये त्याने कसे तो दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्याला Ballet बद्दल माहित झाले याचीमाहिती दिली आहे. यानंतर त्याने इंग्लडमधील या डान्स स्कुलमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्याला याठिकाणाहून एका वर्षाच्या ट्रेनिंगसाठी ऑफर देखील मिळाली पण त्याकरता 25 लाखांची गरज होती. (हे वाचा- बोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना) त्याने केटोच्या मदतीने 17 लाख रुपये जमा केले आणि त्याने या पोस्टमध्ये 3 लाख रुपये देण्यासाठी हृतिकचे आभार मानले आहेत. कमलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून देखील हृतिकचे आभार मानले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या