JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Houseful 4 Trailer : अक्षय कुमारच्या तुफान कॉमेडीला हॉररचा तडका!

Houseful 4 Trailer : अक्षय कुमारच्या तुफान कॉमेडीला हॉररचा तडका!

कॉमेडी ड्रामा असलेल्या या सिनेमात अक्षय कुमार नेहमीपेक्षा वेगळ्या अवतारात दिसणार असून सिनेमातील सर्व कलाकरांचे 600 वर्षांपूर्वीचे जन्म दाखवण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर : अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा ‘हाउसफुल 4’ चे अत्रंगी पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले. ज्यामध्ये सिनेमातील सर्व भूमिकांचे 600 वर्षांपूर्वीचे जन्म दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाउसफुल सीरिजमधला हा 4 सिनेमा आहे. ‘हाउसफुल 4’च्या ट्रेलरनं रिलीज होताच सोशल मीडियावर धमाका केला आहे, पोट धरुन हसायला लावणारी कॉमेडी, हॉरर आणि फुल ड्रामाने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर अक्षय कुमारच्या ‘भूल भूलैय्या’ सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हा ट्रेलर भारतासोबतच युके, ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये एकाचवेळी रिलीज करण्यात आला. यामध्ये अक्षय कुमारसह इतर कलाकरही वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसत आहेत. बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

‘हाउसफुल 4’ चा हा ट्रेलर पाहिल्यावर हे स्पष्ट होतं की हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये एकीकडे कलाकारचं सध्याचं लाइफ दाखवण्यात आलं आहे तर दुसरीकडे त्यांचा 600 वर्षांपूर्वीचा जन्म दाखवला आहे. एकंदर काय तर पुनर्जन्माची कथा या सिनेमात दाखवली जाणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना झालाय ‘हा’ गंभीर आजार, KBC-11 मध्ये केला खुलासा

काही दिवासांपूर्वीच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यात अक्षय कुमार सर्वात आगळ्या वेगळ्या अवतारात दिसत आहे. ‘हाउसफुल 4’ मध्ये प्रत्येक कलाकाराचा डबल रोल असणार आहे. या सिनेमातील एका भूमिकेत अक्षय कुमार टक्कल केलेल्या अवतारात दिसणार आहे. त्यामुळे आता हाउसफुल सीरिज मधील हा 4 सिनेमा प्रेक्षकांचं कितीपत मनोरंजन करणार आणि बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार याची उत्सुकता आहे.

जाहिरात

या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनन, पूजा हेगडे आणि कृति खरबंदा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं असून साजिद नाडियाडवालानं सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या दिवाळीत म्हणजे, 26 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Vogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO ======================================================== SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या