JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / निर्मात्याच्या आत्महत्येनंतर हॉलिवूडमध्ये खळबळ, 27व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

निर्मात्याच्या आत्महत्येनंतर हॉलिवूडमध्ये खळबळ, 27व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीसाठी हा मोठा धक्का होता. यातून सर्वजण सावरत नाहीत तोपर्यंत मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी एक धक्का बसला आहे

जाहिरात

फोटोग्राफरच्या नातेवाईकांनी सांगितले की, तो लग्नसमारंभात फोटोग्राफीचे काम करीत होता..त्याला टीबीचाही त्रास होता..त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीसाठी हा मोठा धक्का होता. यातून सर्वजण सावरत नाहीत तोपर्यंत मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी एक धक्का बसला आहे. हॉलिवूडमधील निर्माते स्टीव्ह बिंग (Steve Bing) यांनी आत्महत्या करून त्यांचे जीवन संपवले आहे. त्यांनी 27व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्याचा करूण अंत केला आहे. अशी माहिती मिळते आहे की कोरोनामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. याठिकाणी नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 55 वर्षाचे निर्माते स्टीव्ह बिंग गेल्या काही काळापासून नैराश्यामध्ये असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी लॉस एंजलिसमधील सेंच्यूरीसिटीमध्ये एका लक्झरी अपार्टमेंटच्या 27 व्या मजल्यावरून उडी मारली. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने हॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. (हे वाचा- गायिका नेहा कक्कर म्हणाली- ‘काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त…’) ‘द पोलर एक्सप्रेस’, ‘बिओवुल्फ’ या चित्रपटांचे निर्माता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ‘द पोलर एक्सप्रेस’मध्ये त्यांनी 80 मिलियन हून जास्त गुंतवणूक केली होती. मीडिया अहवालांच्या मते ते गेल्या काही काळापासून आयसोलेशनमध्ये होते, त्यामुळे कुणाला भेटता येत नव्हतं. परिणामी ते नैराश्याची शिकार बनले.

स्टीव्ह बिंग यांचे नाव त्यावेळी जास्त प्रमाणात चर्चेत होतं, ज्यावेळी ते एलिझाबेथ हर्लेबरोबर (Elizabeth Hurley) रिलेशनशीपमध्ये होते. दोघे अनेक ठिकाणी एकत्र देखील दिसायचे. एलिझाबेथने देखील त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या