JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हिरवे हिरवे गार गालिचे...'; बालकवींची कविता आता सिनेमात, 'फुलराणी'चं पहिलं गाणं आऊट

'हिरवे हिरवे गार गालिचे...'; बालकवींची कविता आता सिनेमात, 'फुलराणी'चं पहिलं गाणं आऊट

बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. आगामी ‘फुलराणी’ या मराठी सिनेमातून ही अजरामर कविता गीतरूपाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जाहिरात

phulrani song

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी: पाठमोरी उभी असलेली ती फुलराणी नेमकी कोण असा प्रश्न मागचे अनेक दिवस सर्वांना पडला होता. मात्र त्या पाठमोऱ्या चेहरा समोर आला आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फुलराणी म्हणून समोर आली.  अभिनेता सुबोध भावे आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुलराणी हा सिनेमा येत्या 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच दमदार टिझर काही दिवसांआधी रिलीज झाला. प्रियदर्शनचा डॅशिंग अंदाज यावेळी समोर आला आहे. टीझरची चर्चा सुरू असताना सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यानं सर्वांना सरप्राइज दिलं आहे. कारण सिनेमात बालकवींची कविता नव्या चालीच ऐकायला मिळणार आहे. “हिरवे हिरवे गार गालिचे,  हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती”. बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ने फुलवल्या. आगामी ‘फुलराणी’ या मराठी सिनेमातून ही अजरामर कविता गीतरूपाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध यानं साकारली आहे. तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे.  संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजलं आहे.  गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. हेही वाच - लग्नाच्या 2 महिन्यांनी राणा दाचं टेलिव्हिजनवर कमबॅक; प्रसिद्ध मालिकेत डॅशिंग भूमिका

फुलराणी सिनेमात गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी,  शरयू दाते यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे.  फुलराणी सिनेमाचं लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केलंय. तर गीतं बालकवी, गुरु ठाकूर,  मंदार चोळकर यांची असून सिनेमाला निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीत हे आदित्य बेडेकर यांचं आहे.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिचा हा पहिलाच सिनेमा आहे. प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. कॉमेडीचं उत्तम टायमिंग असलेल्या प्रियदर्शनीनं सिनेमातही तिची जादू दाखवून दिली आहे. प्रियदर्शनी सिनेमात आग्री कोळी भाषा बोलताना दिसत आहे. “मिस कोलीवारी, झगा मगा आनी मला बघा; फ्री टाईम बुटी क्विन”, प्रियदर्शनीचा हा डायलॉग सध्या व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या