हेमा आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 43 वर्षे पूर्ण
मुंबई, 10 मे- सिनेसृष्टीत काही कलाकारांच्या जोड्या इतक्या सुंदर आहेत की त्यांना लोक आयडल कपल मानतात. या जोडप्यांमधील प्रेम पाहून लोक स्वतः प्रेमात पडतात. बॉलिवूड जगतातील अशीच एक सुंदर जोडी म्हणजे ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी होय. लग्नाच्या 43 वर्षांनंतरही दोघांची जादू कायम आहे. लोक आजही त्यांची जोडी पसंत करतात. परंतु त्याकाळात धर्मेंद्रने हेमासोबत दुसरं लग्न केलं होतं . त्यामुळे अनेकवेळा हेमावर धर्मेंद्रचं घर फोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नुकतंच लग्नाला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हेमाने एका मुलाखतीत धर्मेंद्रसोबतच्या आपल्या लग्नाबद्दल आणि प्रेमाविषयी मोकळेपणाने संवाद साधला. हेमाने सांगितलं की, जर तिने धर्मेंद्रसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं असतं तर आज आयुष्य वेगळं असतं. नुकतंच हेमा आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि यानिमित्ताने हेमाने धर्मेंद्रसोबतचे आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान बॉम्बे टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत हेमाने धर्मेंद्रसोबत लग्न आणि आपल्या आयुष्याविषयी सांगितलं हेमा आणि धर्मेंद्र यांचं लग्न 1980 मध्ये झालं होतं. महत्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमासोबत लग्नगाठ बांधली होती. हेमा आणि धर्मेंद्र यांना अहाना आणि ईशा देओल या दोन मुली आहेत. (हे वाचा: Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनला कशी वागणूक देतात शाहरुख, सलमान आणि आमिर? अभिनेत्याने सांगितलं सत्य, वक्तव्य चर्चेत ) या मुलाखतीमध्ये हेमा यांनी आपल्या लग्नाबाबत बोलताना म्हटलं, ‘प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाशी तरी जुळता, तुम्हाला ती व्यक्ती आवडते आणि मग तुम्ही एकत्र येता. पारंपारिक राहणं कदाचित माझ्यासाठी बनवलं गेलं नसेल आणि त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात खूप काही करत आहे. जर माझे लग्न पारंपारिकरित्या झाले असते तर मी कदाचित काहीच करु शकले नसते’. हेमा यांनी पुढे म्हटलं, ‘आज मी चित्रपट आणि नृत्य करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. राजकारणात सहभागी होत आहे. जे कदाचित परंपरागत जीवनात घडले नसते. हेमाने आपल्या लग्नाच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त ममनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी लिहलेलं की, ‘मी वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांची आभारी आह. ज्यांनी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला इतकं भरभरुन प्रेम दिलं. 43 वर्षांचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि आम्ही आमचा प्रवास असाच सुरु ठेवू’.
धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न- धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये गृहिणी असणाऱ्या प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना सनी, बॉबी, अजिता आणि विजेता अशी चार अपत्ये आहेत. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट न घेताच हेमाशी लग्न केलं होतं. एकत्र काम करताना दोघेही प्रेमात पडले होते. दरम्यान आता लवकरच सनी देओलचा मुलगा करण देओल लग्नबंधनात अडकणार आहे.