आलिया भट्ट-गिल गडोट
मुंबई, 25 सप्टेंबर- आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली जादू पसरवल्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. नुकतंच आलिया भट्टच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. आलिया लवकरच ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. आलिया भट्टने नेटफ्लिक्स ओरिजिनलवरील या थ्रिलर चित्रपटाची पहिली झलक आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. आलियासोबत गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. गॅल आणि नेटफ्लिक्सनेसुद्धा हा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या या पहिल्या झलकही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या टीजरची सुरुवात समुद्रकिनारा आणि वाळवंटातून जाणाऱ्या वेगवान बाइकच्या थ्रिलर शॉट्ससह सुरु होते. त्यांनतर संवाद सुरु होतात आणि ऐकायला मिळतं, “तुम्ही कशासाठी साइन अप केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे - कोणीही मित्र नाही, किंवा कोणतंही नातं नाही’. आपण जे करत आहोत ते खूप महत्वाचं आहे.” यानंतर, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेनेत्री गॅल गॅडोटच्या रेचेल स्टोनच्या पात्राची पहिली झलक पाहायला मिळते. सोबतच या सिनेमातील काही हाय व्होल्टेज ऍक्शन सीन पाहायला मिळतात. डोळे दिपवून टाकणाऱ्या या सीन्सची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने साकारलेल्या किया धवन आणि जेमी डोर्ननं यांच्या पार्कर या पात्रांची एन्ट्री होते. त्यानंतर पुन्हा काही धमाकेदार ऍक्शन सीन पाहायला मिळतात. या चित्रपटात गॅल गडोटने एका गुप्तहेरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे चित्रपटात ऍक्शन थ्रिलर सीन्स पाहायला मिळणं साहजिक असल्याचं लक्षात येत आहे. दरम्यान आलिया भट्टला तिच्या पहिल्या हॉलिवूड डेब्यू चित्रपटात पाहून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.
आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने लिहलंय"हार्ट ऑफ स्टोन’ आणि कियाचा फर्स्ट लुक. 2013 मध्ये नेटफ्लिक्सवर येत आहे." अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
**(हे वाचा:** Ponniyin Selvan: मणिरत्नमच्या आगामी सिनेमाशी आहे ऐश्वर्याच्या लेकीचं खास कनेक्शन; वाचून वाटेल आश्चर्य ) या पोस्टवरुन आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटात किया धवन ही भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट होत आहे. आलिया भट्टचे काही बीटीएस सीन्ससुद्धा समोर आले आहेत. यावरुन चित्रपटात आलिया भट्टची महत्वाची भूमिका असल्याचं दिसून येत आहे. चाहते अभिनेत्रीला हॉलिवूड चित्रपटात पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.