मुंबई, 30 एप्रिल : विकी कौशल सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री हरलीन सेठी डिप्रेशनमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. पण यावर हरलीननं आतापर्यंत गप्प राहणंच पसंत केलं होतं. मात्र ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं विकीसोबत झालेल्या ब्रेकअपवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणाचीही एक्स, आत्ताची किंवा भावी गर्लफ्रेंड नाही असं तिने पिंकव्हिलाशी बोलताना सांगितलं.
‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब सीरिज मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी हरलीन सेठी मागचा काही काळ अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशशिपमुळे बराच काळ चर्चेत होती. या दोघांनीही सोसल मीडियाद्वारे सर्वांसमोर आपल्या नात्याची कबूली दिली होती. मात्र अवघ्या काही माहिन्यातच ते दोघे वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपचं कारण विकी आणि आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर याच्यातील वाढती जवळीक असल्याचं बोललं जातं. त्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं मात्र तिनं आता हा मुद्दा खोडून काढला आहे. ती म्हणाली, ‘मला या गोष्टीनं कोणताही त्रास झाला नाही मात्र माझं कुटुंब या प्रकारानं दुखावलं गेलं आहे.’ वाचा : मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह… पिंकव्हिलाशी बोलताना हरलीन म्हणली, ‘प्रत्येकाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी मला कोणाची एक्स, आत्ताची किंवा भावी गर्लफ्रेंड म्हणून नाही तर हरलीन सेठी म्हणून ओळखावं. मी एका अभिनेत्याला डेट करत होते पण मी कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की माझ्यात काही कमी आहे. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला कोणाचीही एक्स गर्लफ्रेंड म्हणणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा लोकांनी मी जशी आहे तशीच ओळखावं असं मला वाटतं.’
हरलीन पुढे म्हणाली, ‘प्रत्येक कलाकाराला अशा प्रकारच्या भावनिक समस्यांना कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. पण त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.’ अभिनयासोबतच हरलीन एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. ती नेहमी कोरिओग्राफर मेल्वीन लुईससोबत शेअर केलेल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. तिच्या डान्सिंगच्या या कौशल्यामुळं तिनं स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. लवकरच हरलीनच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाहा : VIDEO : शाहरुख खान सहकुटुंब पोहोचला मतदानाला!