JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हर हर महादेव' सिनेमाचा वाद आणखी चिघळला; संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस

'हर हर महादेव' सिनेमाचा वाद आणखी चिघळला; संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस

हर हर महादेव या सिनेमाचा वाद आणखी चिघळला आहे. सिनेमाला संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

जाहिरात

हर हर महादेव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 नोव्हेंबर :  हर हर महादेव हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. इतिहासाची मोडतोड करून सिनेमाची कथा दाखवण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडसह महाराष्ट्रातीली इतर संघटना आणि पक्षांनी केला आहे. सिनेमाच्या विरोधात काल ठाणे आणि पुण्यात सिनेमाचे नियोजित शो बंद पाडण्यात आले.  दरम्यान या प्रकरणी संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.  हर हर महादेव सिनेमाच्या लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पुण्यातून संभाजी ब्रिगेड आणि इतर वंशजाच्या वतीनं कायदेशी नोटीस बजावण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीनं इतिहास दाखवण्यात आला आहे. इतिहासाचं विकृतीकरण केलं गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कायदेशीर नोटीशीमुळे सिनेमाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘हर हर महादेव’ या सिनेमात चुकिच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होत आहे. शिवाजी महाराजांसोबत लढणा-या बांदल सरदारांचे वंशज, पासलकरांचे वंशज व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आणि निर्माते झी स्टुडिओ यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच सिनेमात दाखविण्यात आलेल्या प्रसंगाचा 7 दिवसांच्या आत पुराव्यासह लेखी खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा - प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; हर हर महादेवच्या दिग्दर्शकाची मागणी त्याचप्रमाणे,  शिवाजी महाराज महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मिता आहेत. चित्रपटविषयक स्वातंत्र्याच्या (Cinematic Liberty) नावाखाली इतिहासाचे अशाप्रकारचे विकृतीकरण कसल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. योग्य व समाधानकारक खुलासा न आल्यास या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत, असंही नोटिशीत सांगण्यात आलं आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या वादावर मौन सोडलं आहे. इतिहासाची मोड तोड करून सिनेमा तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.  सगळे दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाला सबमिट केले गेले आणि त्यानंतर सेन्सॉरनं ते मान्य केलं.  म्हणून आम्हाला या विषयी काहीच बोलायचं नाहीये, असं अभिजीत देशपांडे यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे थिएटरमध्ये जाऊन शो बंद पाडले तसेच प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली यावरही अभिजीत देशपांडे यांनी प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी  महाराजांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी,अशी मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या