मुंबई, 4 सप्टेंबर : आज बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्मदिवस आहे. 30 एप्रिल 2020 मध्ये या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं बॉलिवूडनं एक महान कलाकार तर गमावलाच पण त्यांची पत्नी नीतू सिंह यांच्या आयुष्यातही कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनानंतर पत्नी नीतूने एक आठवण शेअर केली होती. नवऱ्याच्या आठवणीत भावुक झालेल्या नीतू यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत एक इमोशन पोस्ट लिहिली होती. पतीच्या निधनानंतर कोणतीही पत्नी आतून तुटते. तसंच काहीसं नीतू यांचंही झालं होतं. नीतू यांनी इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी अशी इच्छा कशी काय व्यक्त करू की हा फोटो नेहमी असाच पूर्ण राहू दे.’ या फोटोमध्ये ऋषी कपूर, नीतू सिंह, रणबीर आणि रिद्धीमा कपूर आणि रिद्धीमाची मुलगी समारा सहानी दिसत आहेत.
ऋषी कपूर यांच्या आठवणीत अशाप्रकारे इमोशनल पोस्ट शेअर करण्याची नीतू यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणीत काही पोस्ट लिहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये आमच्या कथेचा अंत झाला असं लिहिलं होतं.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर फक्त नीतूच नाही तर त्यांची मुलगी रिद्धीमा कपूर ही सुद्धा आपल्या वडीलांना खूप मिस करत आहे. तिनं सुद्धा सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचे अनेक थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. ऋषी कपूर यांचं 30 एप्रिलला मुंबईमध्ये निधन झालं त्याच्या एक दिवस अगोदरच अभिनेता इरफान खानचं निधन झालं होतं. स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी संजय दत्तची लेक त्रिशालानं शाहरुखसोबत केलं होतं फोटोशूट, आता समोर आले Photo अॅसिड अॅटॅकचा वादग्रस्त व्हिडीओ, TikTok स्टारवर भडकली पूजा भट