JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra च्या कुटुंबात पुन्हा एकदा गुड न्यूज, घरी आली 'छोटी परी'

Priyanka Chopra च्या कुटुंबात पुन्हा एकदा गुड न्यूज, घरी आली 'छोटी परी'

प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. प्रियंका चोप्राच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. वाचा काय आहे GOOD NEWS

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनत्री म्हणजे प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra). प्रियंकाचा देसी गर्ल ते ग्लोबल स्टार बनण्याचा प्रवास खुपच अवघड होता मात्र तिनं ती गोष्ट शक्य करुन दाखवली. प्रियंका नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. अशातच प्रियंका पुन्हा एकदा एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. प्रियंका चोप्राच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर पुन्हा एकदा आई झाली आहे. हॉलिवूड स्टार सोफी टर्नर ही दुसऱ्यांदा आई झाली असून तिनं एका मुलीला जन्म दिला आहे. सोफीला पहिलेच दोन वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे प्रियंका आता मोठी आई झाली आहे. प्रियंकाचा नवरा निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनस याच्याशी सोफीचं लग्न झालं आहे. सोफी ही प्रियंकापेक्षा लहान असून दोघींमध्येही खास बॉन्डिंग आहे. हेही वाचा -  ‘प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पेहेरावाची आठवण करून द्यायची..’, राष्ट्रपती निवडीच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदेची मार्मिक पोस्ट सोफी आई झाल्यानंतर तिचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रियंकाही चर्चेत आली आहे. सोफीने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते प्रियांकाच्या लग्नासाठी भारतात आली होते तेव्हा त्यांचे अतिशय शाही पद्धतीने स्वागत करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

सोफी आणि जो जोनसनं 2019 मध्ये लग्नगाठ बांधली. सोफी आणि जो यांनी लग्नाआधी तीन वर्षे एकमेकांना डेट केले आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी फ्रान्समध्ये ते पुन्हा पूर्ण रितीरिवाजांनी लग्नाच्या बंधनात बांधले गेले. सोफी ही हॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोफी ‘द गेम ऑफ थ्रोन्स’ मध्ये झळकली आहे. गेम ऑफ थ्रोन्स व्यतिरिक्त सोफी टर्नरने डिस्रेस्पेक्ट मी, बरेली लेथल, एक्स-मेन: एपोकॅलिप्स, जोशी, टायने फ्रीक, डार्क फिनिक्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. दरम्यान, प्रियंका विषयी बोलायचं झालं तर ती बॉलिवूड चित्रपट ‘जी ले जरा’ मध्ये आलिया भट्ट आणि कॅटरीनासोबत दिसणार आहे. त्यामुळे तिला पुन्हा बाॅलिवूडमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या