जिनिलिया -रितेश
मुंबई, 24 मार्च- बॉलिवूडमधील गोड कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया ला ओळखलं जातं. महाराष्ट्रीयन चाहते तर या दोघांना दादा-वाहिनी म्हणून संबोधतात. हे कपल प्रत्येकालाच आपलंसं वाटतं. या दोघांच्या हटके केमेस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. दोघांनी ‘वेड’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत मराठी इंडस्ट्रीत नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. दरम्यान एका पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना जिनिलियाने चक्क मराठीमधून रितेशसोबत संवाद साधला. जिनिलियाच्या त्या वाक्याने अभिनेताही लाजून लाल झाला होता. जिनिलिया आणि रितेश देशमुख जवळजवळ सर्वांचीच आवडती जोडी आहे. या दोघांमधील प्रेमाचा आणि सामंजस्याचा सर्वांनाच हेवा वाटतो. जिनिलियाने तब्बल 10 वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. महत्वाचं म्हणजे कमबॅकसाठी जिनिलियाने मराठी सिनेमाची निवड करत सर्वांनाच खुश केलं होतं. वेडच्या मध्य,माध्यमातून जिनिलिया पहिल्यादाच मराठीत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली आहे. (हे वाचा: 2 मुलांचा बाप असणाऱ्या धनुषसोबत लग्नगाठ बांधणार प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री? रिलेशनशिपबाबत स्पष्टच म्हणाली…. ) जिनिलियाचा पती आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच सिनेमा होता. अभिनेत्याला पहिल्याच प्रयत्नांत तुफान यश मिळाल्याने सध्या ते चांगलेच खुश आहेत. शिवाय या चित्रपटात या जोडप्याला अशोक सराफसारख्या दिग्गज कलावंताची साथ लाभली होती. त्यामुळे या सिनेमाने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडली आहे.
नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. टीव्हीवर अजून या सोहळ्याचं प्रेक्षेपण झालेलं नाहीय. मात्र सोशल मीडियावर पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. नुकतंच जिनिलिया आणि रितेश देशमुखचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये जिनिलियाला पुरस्कार प्रदान केल्याचं दिसून येत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिनिलिया संवाद साधताना दिसून येत आहे. यावेळी ती आपला पती आणि अभिनेता रितेश देशमुखला म्हणते, ‘अहो… पत्नीने अहो म्हणताच रितेश लाजून लाल होतो. जिनिलिया पुढे म्हणते, ‘तुम्ही मला श्रावणी दिली, मी तुम्हाला हा पुरस्कार देतेय..’ जिनिलियाने ‘वेड’मध्ये श्रावणी नावही व्यक्तिरेखा साकारली आहे.