JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gautami Patil: रुग्णालयाशेजारीच गौतमी पाटीलने धरला ठेका; पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? नव्या वादाला तोंड

Gautami Patil: रुग्णालयाशेजारीच गौतमी पाटीलने धरला ठेका; पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? नव्या वादाला तोंड

Gautami Patil Latest Update: राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. लहानापासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्या अदांवर भाळलेले दिसून येत आहेत.

जाहिरात

पुण्यातील रुग्णालयाशेजारी गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,19 मे- राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. लहानापासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्या अदांवर भाळलेले दिसून येत आहेत. सोशल मीडियावरसुद्धा सतत गौतमी पाटील च्या नावाचा जलवा पाहायला मिळत असतो. अनेकजण चक्क या नृत्यांगनेला लग्नाची मागणी घालताना आणि तिच्यावर प्रेम असल्याच्या शपथा घेतानासुद्धा दिसून येतात. अनेक ग्रामीण भागांमध्ये पुढाऱ्यांचा वाढिदवस असो किंवा यात्राजत्रा असो गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय हे कार्यक्रम पार पडणं म्हणजे अशक्य गोष्ट वाटत आहे. गौतमी पाटीलला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ती सतत विविध ठिकाणी कार्यक्रम करतच असते. परंतु आता आपल्या एका कार्यक्रमामुळे गौतमी पाटील अडचणीत आली आहे. पोलिसांनी त्या भागात कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण. गौतमी पाटीलला या काही महिन्यांमध्ये अफाट लोकप्रियता मिळाली आहे. गावोगावी लोक तिला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी बोलावत आहेत. तिच्या कार्यक्रमांना गर्दी बघण्यासारखी असते. एकीकडे असं असलं तर दुसरीकडे मात्र गौतमी पाटीलला कॉंट्रोव्हर्सी क्वीनसुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे. कारण गौतमीचा कोणताही कार्यक्रम वादविवादांशिवाय आणि विचित्र प्रकारांशिवाय पार पडतच नाही. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात कोणता ना कोणता राडा होताना दिसून येतो. कधी जमलेल्या प्रेक्षकांनाकडून तर कधी आयोजकांकडून तर कधी स्वतः गौतमीकडून काही ना काही प्रकार घडतच असतात. (हे वाचा: Aai Kuthe Kay Karte फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ नवऱ्याला पाहिलंय का? सेटवरच सुरु झालेली Love Story ) आता पुन्हा एकदा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसून येत आहे. नुकतंच पुण्यात गौतमी पाटीलच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु हा कार्यक्रम पुण्यातील एम्स रुग्णलायापासून अवघ्या काहीच पावलांवर असलेल्या एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम तर पार पडला मात्र, आता या कार्यक्रमाच्याविरोधात आवाज उठवला जात आहे. त्याचं कारण असं की, हा कार्यक्रम पुण्यातील, औंध येथील एम्स रुग्णलयाच्या शेजारी पार पडला. रुग्णालयाच्या जवळपास १०० किमी अंतरापर्यंत सायलंट झोन असताना पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. या विषयामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसून येत आहे.

सांगायचं झालं तर, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गौतमी पाटीलच्या सर्व कार्यक्रमांची पार्श्वभूमी पाहता तिचा एकही कार्यक्रम वादाशिवाय पार पडलेला नाही असंच लक्षात येतं. गौतमी पाटील स्वतः अनेकवेळा अश्लील हावभाव करत वादात सापडली आहे. यासाठी तिने नंतर दिलगिरीसुद्धा व्यक्त केली होती.आज गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी २ ते ५ लाख रुपयांची सुपारी घेत असल्याचं म्हटलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या