JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gangubai Kathiawadi: '...ती वेश्या नव्हती', समोर आली रिअल 'गंगूबाई'ची नात

Gangubai Kathiawadi: '...ती वेश्या नव्हती', समोर आली रिअल 'गंगूबाई'ची नात

Gangubai Kathiawadi: या चित्रपटासंदर्भात गंगूबाई यांची नात भारती सोनवणे (Bharti Sonawane) आणि वकील नरेंद्र यांनी निर्मात्यांवर जोरदार टीका केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित आणि अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. चित्रपट आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहायला मिळतं. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटदेखील काही कारणांमुळे वादात सापडला आहे. या चित्रपटात गंगूबाई या ‘सेक्स वर्कर’ (Sex Worker) असल्याचं दाखवलं गेलं आहे. यामुळे गंगूबाई यांची प्रतीमा खराब होत असून, यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगून गंगूबाई यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या केसवर सुनावणी सुरू आहे. ‘चित्रपटाशी संबंधित वाद दूर होण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाचं नाव बदलण्याबाबत विचार करावा,’ अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या संदर्भात गंगूबाई यांची नात भारती सोनवणे (Bharti Sonawane) आणि वकील नरेंद्र यांनी निर्मात्यांवर जोरदार टीका केली आहे. हे वाचा- मुंबई उच्च न्यायालयाकडून अमिताभ बच्चन यांना मोठा दिलासा,काय आहे BMC VS BIG B वाद गंगूबाईंच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी तुमच्याशी चित्रपट निर्माते किंवा लेखकांनी संपर्क साधला होता का, या प्रश्नावर उत्तर देताना भारती सोनवणे यांनी सांगितलं, की ‘याबाबत माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. झैदी यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असल्याचं निर्मातं सांगत आहेत; मात्र याबाबत कोणतीही विचारणा झाली नसल्याची कबुली खुद्द झैदी यांनीही दिली आहे.’ TOI ने याबाबत वृत्त दिले आहे. ‘गंगूबाई आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलेल्या कथांवर हा चित्रपट आधारित आहे, असं झैदी यांनी सांगितलं आहे. त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय हे पुस्तक लिहिलं आहे,’ असं वकील नरेंद्र यांनी सांगितलं. बाबूराव शाह आणि इतर मुलांना (शकुंतला रणजीत कावी- भारतीची आई, सुशीला रेड्डी आणि रजनीकांत रावजी शाह) गंगूबाईंनी दत्तक घेतलं होतं. झैदी यांनी त्यांच्या पुस्तकात याचा संदर्भ दिला आहे. त्यांना 1947मध्ये दत्तक घेतलं गेलं, पण दत्तक कायदा 1956 मध्ये करण्यात आला. भारतीच्या आईला दत्तक घेतेवेळी दत्तक कायदा ठोस नव्हता. त्यामुळे त्यांना नातेवाईकांची प्रतिमा जपायची असेल, तर ते प्रथम न्यायालयात उभे राहून ते संबंधित असल्याचं सिद्ध करू शकत नाहीत आणि नंतर गंगूबाईंची प्रतिमा खराब होऊ नये, असा युक्तिवाद करू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हे वाचा- ‘रात्री 3 वाजता डिलिट करतोय घाणेरड्या कमेंट्स’,अश्नीर ग्रोव्हर यांची प्रतिक्रिया जेव्हा एखाद्या व्यक्तीची सार्वजनिकपणे बदनामी होते, तेव्हा त्याने प्रथम काय केलं पाहिजे? त्याची/तिची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी किंवा त्याला /तिला त्यांची प्रतिष्ठा सिद्ध करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जाणं, असा सवालही विचारण्यात आला आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी रिलीज थांबवण्यामागे तुमचा हेतू काय आहे, असं विचारलं असता, भारती म्हणाल्या की, ‘हा चित्रपट तयार करण्यापूर्वी कोणाचीही संमती घेण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी गंगूबाईंची जी प्रतिमा चित्रपटात दाखवली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी आमचे वकील काम करत आहेत. 2020 पासून आम्हाला न्याय आणि संधी नाकारली जात आहे.’ ‘गंगूबाई काठियावाडी चित्रपटात त्यांनी माझ्या आजीची भूमिका ज्या दृष्टिकोनातून साकारली आहे, त्याच दृष्टीकोनातून कोणत्याही आईची कल्पना करून बघावी, असं मला त्यांना सांगायचं आहे. ही बदनामी आहे आणि मी हे सहन करणार नाही. ती माझी आजी होती. ती कामाठीपुऱ्यात राहिली यात तिची चूक नव्हती. कामाठीपुऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. मग कामाठीपुऱ्यातल्या सर्व महिला वेश्या आहेत का? त्यांनी आमचं नाव बदनाम केलं आहे. आम्ही कोणाला तोंड दाखवू शकत नाही. तुमची आजी अशी होती, असा प्रश्न आमचे नातेवाईक आणि अन्य व्यक्ती आम्हाला विचारत आहेत. ती दररोज पोलिसांशी संवाद साधत असे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ती वेश्या  नव्हती,’ असं भारती सोनवणे यांनी सांगितलं. हे वाचा- ‘गंगूबाई’ प्रकरणात न्यायमूर्तींनी सांगितलेली घटना ऐकून कोर्टातील लोक झाले सुन्न! ‘सध्या आमचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे प्रकरण कधीही न्यायालयासमोर येऊ शकते, असं मी ऐकलंय. त्यामुळे आमची शेवटी आशा सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. हे एक अनोखं प्रकरण आहे. यातून कायदा तयार होऊ शकतो. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेत एकही असं प्रकरण दाखल झालेलं नाही,’ असं वकील नरेंद्र यांनी सांगितलं. ‘त्यांचा हा चित्रपट एखाद्या मृत व्यक्तीबद्दलच्या पुस्तकावर आधारित आहे, असा दावा जर ते करत असतील तर मृतांचे वंशज असतील, यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेतली पाहिजे, अशी मूलभूत जाणीव त्यांना असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या खऱ्या व्यक्तीवर चित्रपट बनवता तेव्हा तुम्हाला कायदेशीर बाबींचीही जाणीव असायला हवी,’ असं भारती सोनवणे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या