JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gangubai Kathiawadi: कंगना रणौतशी तुलना होताच अशी होती आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली...

Gangubai Kathiawadi: कंगना रणौतशी तुलना होताच अशी होती आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली...

या चित्रपटात आलियाची तुलना कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि विद्या बालनसोबत (Vidya Balan) केली जात आहे. यावर आलियाने प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी: आलिया भट्टच्या (Alia Bhatt Gangubai Kathiawadi) आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध करणारी आलिया आता नव्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरमध्ये हा चित्रपट मोठा हिट ठरणार असल्याचं मानलं जात आहे. या चित्रपटात आलियाची तुलना कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि विद्या बालनसोबत (Vidya Balan) केली जात आहे. यावर आलियाने प्रतिक्रिया दिली आहे. आलिया भट्ट म्हणते ‘हे माझ्या ऐकिवात नाही’ संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्ट ही एका सेक्स वर्करच्या भूमिकेत असून, जी नंतरच्या काळात रेड लाईट एरियाची (Red Light Area) लीडर बनते अशी सिनेमाची कथा आहे. कोईमोई वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं सांगितलं की, ‘मला या चित्रपटात कास्ट करण्यात आलं, हिच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.’ या वेळी जेव्हा तिला विचारण्यात आलं की, ‘तुझी तुलना कंगना रणौत आणि विद्या बालनशी केली जात आहे’. तेव्हा ही अभिनेत्री म्हणाली की,‘नाही, मी असं काहीही ऐकलेलं नाही.’ हे वाचा- गंगूबाई काठीयावाडी कोण होती? प्रेमासाठी घरातून पलायन ते माफिया क्वीन कशी झाली? आलियाने तिच्या कास्टिंगबद्दल दिली प्रतिक्रिया यावेळी पुढे बोलताना आलिया म्हणाली की, टलोकांनी कास्टिंगच्या अनुषंगाने असं सुचवलं असेल. पण मला वाटत नाही की कुणी त्यात पडावं. गेल्या 25 वर्षांपासून दिग्दर्शन करत असलेला दिग्दर्शक या चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी नेमकं कोणाला कास्ट करायचं, हे नक्कीच जाणतो. एखाद्याला वाटत असेल की या भूमिकेसाठी मी योग्य नाही, तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे.’ कंगनाने मुलीच्या व्हिडीओवर घेतला आक्षेप काही दिवसांपूर्वी आलिया साकारत असलेल्या गंगूबाई या पात्राची नक्कल लहान मुलगी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावरून कंगना भडकली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर आक्षेप घेत मुलीने असं करणं योग्य नसल्याचं तिनं म्हटलं होतं. हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटात आलिया एका सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. हे वाचा- Hijab चे समर्थन मात्र स्वत: तोकडे कपडे घातल्यामुळे स्वरा भास्कर ट्रोल, म्हणाली.. महेश भट्ट यांना या फिल्मकडून आहेत मोठ्या आशा आलियाच्या या आगामी चित्रपटामुळे तिचे वडील महेश भट्ट खूप प्रभावित झाले आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या ट्रेलरच्या रिलीजवेळी ई-टाईम्सला प्रतिक्रिया देताना, महेश भट्ट म्हणाले होते की, ‘आलिया गंगूबाईच्या रुपात तिच्या सर्व ताकदीनिशी उभी आहे, कारण तिने स्वतःला मॉडेल म्हणून सादर केलेलं नाही. यासोबत तुम्ही कोण आहात तेच रहा असा संदेश देण्यात आला. क्षणभरही तुम्ही जे कोण आहात त्यापेक्षा वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करू नका, तरच तुम्ही तुमचा सुगंध शेअर करू शकाल.’ सिनेमाच्या ट्रेलरनंतर तसंत यातील गाणी रीलिज झाल्यानंतर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कशी कामगिरी करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या