JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टॉम हँक्सनंतर आता गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता Coronavirus पॉझिटिव्ह

टॉम हँक्सनंतर आता गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता Coronavirus पॉझिटिव्ह

गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय वेबसीरिजच्या अभिनेत्यालाही या व्हायरसची लागण झाली असून त्यानं त्याच्या सोशल मीडियावरुन याची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मार्च : सध्या जगभरात CoronaVirus नं अक्षरशः थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे जगात आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं बळी गेले आहे. यातून सेलिब्रेटी सुद्धा सुटलेले नाहीत. काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिदध अभिनेता टॉम हँक्स यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर आता गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय वेबसीरिजच्या अभिनेत्यालाही या व्हायरसची लागण झाली असून त्यानं त्याच्या सोशल मीडियावरुन याची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेता Kristofer Hivju यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. त्यानं लिहिलं, मला हे सांगताना दुःख होत आहे की मी कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. मी आज माझे कुटुंबीय घरीच उपचार घेत आहोत. आमची तब्येत ठिक असून आम्हाला फक्त थंडीची लक्षणं दिसत आहेत. बऱ्याच लोकांसाठी हा व्हायरस अत्यंत घातक ठरला आहे. त्यामुळे सर्वांना यासंबंधी योग्य ती काळाजी घेण्याची विनंती करतो. मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

हॉलिवूडमध्ये पहिल्यांदा टॉम यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी संदर्भात एक ट्वीट केलं होतं. ते म्हणाले, आम्ही दोघं ऑस्ट्रेलियाला गेले होतो, त्यानंतर आम्हाला ताप आला आणि अंगही दुखायला लागलं होतं. त्यानंतर आम्ही कुठलाही वेळ न घालवता टेस्ट करून घेतली. त्यानंतर ती पॉझिटीव्ह निघाली. आता आम्ही कोरानासाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये आहोत. उपचार सुरु आहेत. निष्काळीपणा न करता काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जा आणि टेस्ट करा असला सल्लाही त्यांनी दिला. ‘खतरों के खिलाडी’ कंटेस्टंटचा BOLD लुक, बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर VIRAL

जाहिरात

याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ओल्गा कुरिलेन्कोने (Olga Kurylenko) खुलासा केला आहे की ती कोरोनाव्हायरस पॉसिटीव्ह आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. 2008 च्या जेम्स बाँड चित्रपटाच्या क्वांटम ऑफ सोलेस (2008’s James Bond film Quantum of Solace) आणि 2013 ची साय-फाय फिल्म ओब्लिव्हियनमध्ये (2013’s sci-fi movie Oblivion) मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ती घरीच बंद आहे. यासंदर्भात ओल्गाने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

जाहिरात

युनिव्हर्सल म्युझिक चेअरमन आणि सीईओ लुसियन ग्रेनगे यांना आठवडाभरासाठी संक्रमणाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जगातील अनेक ठिकाणी सिनेमागृहे बंद आहेत, त्यामुळे अनेक चित्रपटांचं प्रदर्शन पुढे ढकलण्याल आलं आहे. या महिन्यात प्रदर्शित होणारा जेम्स बाँड चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ हा चित्रपट देखील नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुरने बाबांच्या वाढदिवशी घेतली नवी चारचाकी गाडी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या