मुंबई, 09 जुलैः ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील डॉ. हंसराज हाथी फेम कवी कुमार आझाद यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वोकार्ड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘तारक मेहता…’ ही मालिका लवकरच 10 वर्ष पूर्ण करणार आहे. याचसंदर्भात मालिकेच्या सेटवर आज एक मीटिंगदेखील होणार होती. मात्र या दुःखद बातमीमुळे सेटवरील साऱ्यांचेच मन सुन्न झाले. मालिकेतील सर्व कलाकार एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहत असल्यामुळे आपल्या जिवलग मित्राचे झालेले आकस्मित निधन सर्वांच्याच जिव्हारी लागले. म्हणूनच आज सर्वांनी मिळून मालिकेचे चित्रीकरण रद्द केले. गेल्या अनेक वर्षांपासून कवी कुमार आझाद हे त्यांच्या वाढत्या वजनामुळे अधिक त्रस्त झाले होते. आता त्यांचे वजन सुमारे 215 किलो एवढे होते. या वाढत्या वजनाला कंटाळून त्यांनी 2010 मध्ये एक शस्त्रक्रियाही केली होती. या शस्त्रक्रियेच्या आधारेच त्यांनी सुमारे 80 किलो वजन कमी केले होते. वजन कमी झाल्यानंतर ते अधिक उत्साही वाटायचे. चपळाईने चालणं, धावणं अशा गोष्टी ते करु शकत होते. त्यांच्यातील हा बदल त्यांच्या चाहत्यांनाही सुखद धक्का देऊन गेला. पण एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एकदा वाढतं वजन ही त्यांची डोकेदुखी झाली होती. असे म्हटले जाते की, वजन कमी करण्यासाठी ते अनेक उपाय ही करत होते. हेही वाचाः तारक मेहताच्या कलाकारांना धक्का, दिवसाचे शुटिंग केले रद्द … म्हणून ‘सेक्स टॉक’साठी एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचे तयार केले FB अकाऊंट अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा