salman-shahrukh khan
मुंबई, 6 सप्टेंबर: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘टायगर 3’. गेल्या अनेक दिवसांपासून टायगर 3 चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमानच्या या चित्रपटात शाहरुख खानही या चित्रपटात दिसणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र सलमान आणि शाहरुखला एकत्र सीन शूट करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना शूटसाठी वेळ मिळत नसल्याचं समोर आलं होतं. अशातच याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि सलमान खानला व्यस्त शेड्युलमधून ‘टायगर 3’ साठी एकत्र शूट करण्याचा वेळ मिळाला आहे. दोघेही या महिन्याच्या अखेरीस मुंबईत टायगर 3 च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करणार आहेत. अनेक दिवसांपासून या दोन्ही खानला एकत्र पाहण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे. दोघांचेही चाहते खूप उत्साही असून सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता चाहते ‘टायगर 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी सलमान खानने चित्रपटाशी संबंधित एक टीझर शेअर केला होता. यामध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख सांगण्यात आली होती. बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ पुढील वर्षी 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे. हेही वाचा - Shehnaaz Gill : लालबागच्या दरबारात शहनाज गिल सोबत अनोख्या रुपात दिसला सिद्धार्थ शुक्ला; पाहून तुम्हीही व्हाल EMOTIONAL दरम्यान, मनीष शर्मा सलमान खानच्या ‘टायगर 3’चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी, दानिश हुसैन आणि कुमुद मिश्रा सारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे.