मुंबई, 24 मे : सध्या कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं आहे. ज्यातून बॉलिवूड सेलिब्रेटींचीही सुटका झालेली नाही. या व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लॉकडाऊन असतानाही या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या रोज वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता किरण कुमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध निर्मात-दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्वीट करुन माहिती दिली. कुणाल कोहली यांनी कोविड-19 मुळे त्यांच्या कुटुंबाती प्रिय व्यक्तीला गमावलं आहे. कुणाल कोहली यांनी कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या मावशीचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांच्या अखेरचं दर्शनही घेऊ न शकल्याची खंतही त्यांनी या ट्वीटमध्ये बोलून दाखवली. कुणाल यांचं म्हणणं आहे की, मावशीच्या निधनानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र येऊन शोक व्यक्त करू शकत नाही. कुणाल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, कोविड-19 मुळे 8 आठवड्यांच्या संघर्षानंतर मी माझ्या मावशीला गमावलं. त्या शिकागोमध्ये होत्या आणि मी त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकलो नाही. श्रीदेवीमुळे अनिल आणि बोनी यांच्यात झालं होतं जोरदार भांडण, वाचा नेमकं काय घडलं
कुणाल यांनी पुढे लिहिलं, आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि सर्वांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे. पण या कठीण काळात आम्ही सर्वजण एकमेकांसोबत नाही आहोत. आता मी माझी आई, मावशी आणि मामा यांना एकत्र कधीच पाहू शकणार नाही. ही वेळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. त्यांची मुलगी रोज हॉस्पिटलला जात असे आणि आपल्या कारमध्ये बसून प्रार्थना करत असे. कारण त्यांना आत जाण्याची परवानगी नव्हती. कोरोना व्हायरसनं काय वेळ आणली आहे आपल्यावर असं व्हायला नको. कुणाल यांच्या या ट्वीटवर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यासोबतच त्यांच्या मावशीच्या आत्म्यास देव शांती देवो अशी प्रार्थना सुद्धा केली आहे. याशिवाय शनिवारी अभिनेता वरुण धवनच्या मावशीचं सुद्धा कोरोना व्हायरमुळे निधन झालं. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली होती. शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा सपना चौधरीला स्टेजवर सर्वांसमोर तरुणानं केलं KISS, सोशल मीडियावर Photo Viral