JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Filmfare Awards: मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला फिल्मफेअर, पाहा लिस्टमध्ये आणखी कोण

Filmfare Awards: मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला फिल्मफेअर, पाहा लिस्टमध्ये आणखी कोण

नुकतंच 67 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा हिंदीसोबतच मराठी सिनेसृष्टीसाठीही खास ठरला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट-   नुकतंच 67 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा हिंदीसोबतच मराठी सिनेसृष्टीसाठीही खास ठरला. कारण या सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनेत्रीने लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन सध्या सईवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांपासून सह कलाकारांपर्यंत सर्वांनीच सईचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ या चित्रपटात सई ताम्हणकरने काम केलं होतं. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होती. क्रितीने या चित्रपटात एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. तर मराठमोळ्या सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. क्रितीसोबतच या चित्रपटातील सई ताम्हणकरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक आलं होतं. सईला मिळालेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार हे तिच्या कामाची सर्वात मोठी पोचपावती म्हणावी लागेल. सध्या पुरस्कार मिळाल्याने अभिनेत्री प्रचंड आनंदी आहे. यावेळी रणवीर सिंह आणि क्रिती सेननने अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. मंगळवारी फिल्ममेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘83’मध्ये माजी भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी रणवीरला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचवेळी ‘मिमी’ या समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटात सरोगेट आईच्या भूमिकेसाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ‘शेरशाह’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. (हे वाचा: Sai tamhankar Filmfare Look: फिल्म फेअरसाठी सईचा किलर लुक! कातिल अदांवर चाहते फिदा **)** समीक्षण श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘शेरनी’साठी विद्या बालनलादेखील पुरस्कार देण्यात आला आहे. समीक्षक श्रेणीमध्ये, विकी कौशलने ‘सरदार उधम’ मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात विकी कौशलने क्रांतिकारी नेते उधम सिंह यांची भूमिका साकारली होती. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये मायकेल ओडवायरला गोळ्या घातल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या