JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इन्स्टा पोस्ट शेअर करत फॅशन डिझायनरने संपवलं आयुष्य, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इन्स्टा पोस्ट शेअर करत फॅशन डिझायनरने संपवलं आयुष्य, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

काही दिवसांपूर्वी आकांक्षा दुबे या अभिनेत्रीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. तिच्या आत्महत्येचा तपास सुरुच असतांना आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका फॅशन डिझायनरनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

muskan-narang

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 एप्रिल- काही दिवसांपूर्वी आकांक्षा दुबे या अभिनेत्रीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. तिच्या आत्महत्येचा तपास सुरुच असतांना आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका फॅशन डिझायनरनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ठाणे सिव्हिल लाईन्स परिसरातील रामगंगा विहार कॉलनीत राहणारी 25 वर्षीय फॅशन डिझायनर मुस्कान नारंग हिचा मृतदेह पंख्यांला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील राम गंगा विहार कॉलनीत मुस्कानचं कुटुंब राहतं. मुस्कानने देहरादून येथे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्यानंतर मुंबईत येऊन ती फॅशन डिझायनिंगमध्ये नोकरी करत होती. मार्च महिन्यात होळीसाठी मुस्कान तिच्या घरी परतली होती. तेव्हापासून ती तिच्या कुटुंबीयांबरोबर राहत होती. वाचा- रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना गोविंदाच्या भाचीसोबत घडला विचित्र अपघात या घटनेबद्दल माहिती देतांना मुस्कानचे वडील चंद्र प्रकाश नारंग यांनी सांगितले की, रात्री आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर ती खोलीत झोपायला गेली. शुक्रवारी सकाळी मुस्कानच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ न उघडल्यानं घरातील लोक बराच वेळ बाहेरून मुस्कानला फोन करत होते मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. कोणतेही उत्तर न मिळाल्याने भीतीने खिडकीतून आत डोकावले असता त्यांना मुस्कानचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

संबंधित बातम्या

आत्महत्या करण्यापूर्वी मुस्कानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. हा माझा शेवटचा व्हिड्ओ आहे. यानंतर कदाचित मी तुम्हाला कधी दिसणार नाही. प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, असं लोक म्हणतात. पण, असं काहीच होत नाही. माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सगळे मलाच समजवायला लागले.

आज मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये, असं मुस्कान या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या