JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Farmani naaz : हर हर शंभो गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या गायिकेने थेट गायलं 'चढती जवानी'; व्हिडीओ तुफान व्हायरल

Farmani naaz : हर हर शंभो गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या गायिकेने थेट गायलं 'चढती जवानी'; व्हिडीओ तुफान व्हायरल

फरमानी नाज ही मुस्लिम गायिका असून तिने ‘हर हर शंभू’ हे भजन गायल्याने वाद निर्माण झाला होता. तिने आजपर्यंत अनेक भक्तिगीतं गायली आहेत. पण यावेळी तिने वेगळ्या धाटणीचं गाणं गायलं आहे.

जाहिरात

farmani naaz new song chadti jawani

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,12 सप्टेंबर : नुकतंच गणपतीत तुम्ही  हर हर शंभू’ हे गाणं  बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल.  सोशल मीडियावर सुद्धा  ‘हर हर शंभू’ हे गाणं तुफान गाजतंय. या गाण्याला आवाज देणारी गायिका फरमानी नाज हिचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पण मुस्लीम असलेल्या फरमानीने हर हर शंभू हे गाणं गायल्याने तिच्याविरोधात मुस्लिम समाज उभा ठाकला. पण तिनेदेखील या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. आता  ‘इंडियन आयडयल’ फेम आणि यूट्यूबर फरमानी नाज पुन्हा एकदा नव्या एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे. फरमानी नाज ही मुस्लिम गायिका असून तिने ‘हर हर शंभू’ हे भजन गायल्याने वाद निर्माण झाला होता. पण सोबतच तिने अनेकांची मन जिंकून घेतली होती. तिने आजपर्यंत अनेक भक्तिगीतं  गायली आहेत. पण यावेळी तिने वेगळ्या धाटणीचं गाणं  गायलं आहे. तिच्या नवीन गाण्याचे बोल ‘चढती जवानी’ असे आहेत. हे गाणं  अनुज मुऱ्हेडा यांनी लिहिले आहेत. तर मनीष त्यागी यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे गायक असण्यासोबतच फरमाणी नाज हिने संगीतदेखील दिलं  आहे. हे गाणं  अल्पावधीतच हिट झालं आहे. एवढ्या काही तासातच ५ लाखांहून जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत.

फरमानी नाझने अल्पावधीतच स्वत:ची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. ती यशाच्या पायऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, तिचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. फरमानीच्या ‘चढती जवानी’ गाण्याने रिलीज होताच धुमाकूळ घातला आहे. ‘चढती जवानी’ हे गाणे फरमाणी नाझने नव्या पद्धतीने सादर केले आहे. वंशिका हिने या गाण्यात परफॉर्मन्स दिला आहे. हेही वाचा - Farmani Naaz: फरमानी नाज इतक्या महागड्या स्टुडिओत करते रेकॉर्डिंग; आलिशान घर पाहून सर्वच थक्क सोशल मीडिया स्टार फरमानी आता 1 कोटीच्या स्टुडिओमध्ये गाणी रेकॉर्ड करते आणि तिचं घरही खूप आलिशान आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अभिलाषा पांडा हिने गायलेले हर हर शंभू गाणं आपल्या आवाजात म्हणणारी फरमानी इंडियन आयडॉलमध्येही दिसली होती. आता तिच्याबाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच ती बिग बॉस १६ या सीझनमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सलमानकडूनच फरमानीला ही ऑफर मिळाली असल्याचं बोललं जात आहे. फरमानीविरोधातील वाद अजूनही सुरूच आहे. मुस्लिम समाजाने फरमानीने हे गाणं गायल्याबद्दल फतवा काढला आहे. मुस्लिमांच्या विरोधाला कंटाळून फरमानी हिंदू धर्म स्वीकारणार असल्याच्याही बातम्या धडकत आहेत, पण सध्या तरी ही अफवा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या