JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / फरहान अख्तरसह लग्नानंतर शिबानी दांडेकरचा लेटेस्ट Photo पाहून चाहते हैराण, असं काय आहे फोटोत

फरहान अख्तरसह लग्नानंतर शिबानी दांडेकरचा लेटेस्ट Photo पाहून चाहते हैराण, असं काय आहे फोटोत

शिबानी आणि फरहान दोघांनीही आपल्या लग्नसोहळ्यातील अनेक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण त्यांच्या एक फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. या फोटोशूटमधून शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : बॉलिवूडची पॉप्युलर जोडी मागील अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांपासून आता दोघांचं लग्न झाल्यावरही ते तितकेच चर्चेत आहेत. फरहान आणि शिबानी 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतरही सोशल मीडियावर (Social Media) दोघे सतत अॅक्टिव्ह असून दोघांनीही आपल्या लग्नसोहळ्यातील अनेक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण त्यांच्या एक फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. या फोटोशूटमधून शिबानी प्रेग्नंट (Pregnant) असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. लग्नातील काही फोटोमध्ये शिबानीचा बेबी बंप (Baby Bump) दिसत होता आणि आता नुकत्याच समोर आलेल्या फोटोशूटमध्येदेखील तिच्या पोटाचा घेर वाढलेला दिसत आहे. त्यावरूनच शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला. या स्टार कपलनं जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या दोघेही आपल्या लग्नातील काही अनसीन फोटो (Unseen Photos) शेअर करून त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसाच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

हे वाचा -  या कारणासाठी आलियाला सोडावं लागलं शिक्षण, नेमकी कधी सुटली शाळा?

अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरने अलीकडेच सोशल मीडियावर प्री-वेडिंग बॅशचे (Pre-wedding Bash) काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं गोल्डन सिक्विन वर्क असलेला अतिशय सुंदर शॉर्ट स्कर्ट ड्रेसघातला आहे. सोबत फरहानदेखील पांढऱ्या सूटमध्ये दिसत आहे. पण या फोटोंमधील एक फोटो पाहून चाहत्यांनी शिबानीच्या प्रेग्नन्सीचा (Pregnancy) अंदाज लावला आहे. काही इंटरनेट युजर्सनी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या या फोटोवर कमेंट करून ‘तू प्रेग्नंट आहेस का?’ असा प्रश्नदेखील शिबानीला केला आहे. शिबानी प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी घाईत लग्न केल्याची जोरदार चर्चाही सुरू आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा -  उर्वशी रौतेलाच्या हॉटनेसने लावली आग ; बिकिनी Video Viral

अधुना भाबानीसोबत 17 वर्ष संसार केल्यानंतर फरहान तिच्यापासून वेगळा झाला होता. त्यानंतर फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत होते. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आता लग्न केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या