JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पायऱ्यांवरुन पडला गायक Jubin Nautiyal; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल

पायऱ्यांवरुन पडला गायक Jubin Nautiyal; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियालविषयी एक वाईट बामती समोर आली आहे. गायकाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

जाहिरात

जुबिन नौटियाल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 डिसेंबर : प्रसिद्ध  बॉलिवूड गायक जुबिन नौटियालविषयी एक वाईट बामती समोर आली आहे. गायकाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. जुबिन गुरुवारी त्याच्या घराच्या पायऱ्यांवरुन खाली पडला. त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली कोसळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो बरा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक जुबिन नौटियालला गंभीर दुखापत झाली असून त्याची कोपर तुटली आहे. सोबत त्याच्या बरगडया आणि कपाळावरही जखम झाली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णायलयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील रुग्णालयात जुबिनला दाखल करण्यात आलं असून त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉक्टरांनी त्याला उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला आहे, असं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. सध्या चाहते आणि मित्र-परिवार त्याला लवकरच ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

संबंधित बातम्या

जुबिन नौटियालचं नुकतंच ‘तू सामने आये’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात त्याने गायक योहानीसोबत आवाज दिला आहे. गायकाने गुरुवारी योहानीसोबत हे गाणे लाँच केले. जुबिनचे हे गाणे खूप पसंत केले जात आहे. याशिवाय बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांतील गाण्यांना सिंगरने आपला आवाज दिला आहे. त्यांचे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील आले आहेत जे सुपरहिट झाले आहेत. जुबिन नौटियाल राता लंबियां, लूट गए, हमवा मेरे आणि तुझे कितने चाहने लगे हम, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा यांसारख्या आंतरराष्ट्रीय हिट गाण्यांसह, लोकांना त्याला व्हिडिओंमध्ये पाहायला आवडते. अलीकडेच या गायकाने गोविंदा नाम मेरा मधले बना शराबी शमिल आणि थँक गॉड या चित्रपटातील माणिके हे गाणेही गायले आहे.

दरम्यान, जुबिनने अनेक मेहनतीने बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांमध्ये जागा मिळवली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याचे लोखो चाहते असून तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या गाणीही ट्रेंड करत असतात. त्याने त्याच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या