JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Stephen Boss : प्रसिद्ध अमेरिकी अभिनेता स्टीफन बॉसची आत्नहत्या, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

Stephen Boss : प्रसिद्ध अमेरिकी अभिनेता स्टीफन बॉसची आत्नहत्या, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आलीये. प्रसिद्ध हॉलविड अभिनेता, डान्सर, डीजे, स्टीफन बॉसने जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात

स्टीफन बॉस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आलीये. प्रसिद्ध हॉलविड अभिनेता, डान्सर, डीजे, स्टीफन बॉसने जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्टीफन बॉसने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत पोलिसांना बॉसचा मृतदेह सापडला. दुसरीकडे, स्टीफन बॉसची पत्नी एलेन हॉकर म्हणते की बॉस त्याची कार न घेता घरातून निघून गेला, ही एक विचित्र गोष्ट होती, कारण बॉस कधीही त्याच्या कारशिवाय कुठेही जा नाहीत. याबाबतचं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे. स्टीफन बॉसच्या अचानक जाण्यामुळे सगळेच धक्क्यात आहेत. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यामातून दुःख व्यक्त करत आहेत. हेही वाचा - Shriya Pilgaonkar : ताजा खबर! श्रिया पिळगावकर साकारणार सेक्स वर्करची भूमिका स्टीफन बॉसची पत्नी एलेन हॉकरने एक निवेदन जारी करत सांगितलं की, ‘मला जड अंतःकरणाने सांगावं लागत आहे की माझे पती स्टीफन सर्वांना सोडून गेले आहेत. ते आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व द्यायचे. प्रेम त्यांच्यासाठी सगळं काही होतं. ते आमच्या कुटुंबाचा कणा होते. ते एक चांगले पती आणि एक चांगले वडिल होते. या कठिण काळात आमच्या गोपिनियतेची काळजी घ्या. माझ्या आणि माझ्या तीन मुलांची काळजी घ्या’

दरम्यान, स्टीफन बॉस याच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबासाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचेही वृत्तात सांगितलं जात आहे. मात्र, त्यानं आत्महत्येसारखं मोठं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या मृत्यूची बातमी त्याची पत्नी एलेन हॉकरने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या