श्रिया पिळगावकर सेक्स वर्करच्या भूमिकेत
अभिनेता सचिन पिळगावकरची लेक श्रिया पिळगावकर कायम चर्चेत असते.
श्रियाने तिच्या दमदार अभिनयामुळे तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रत्येक वेळी ती वेगळ्या थाटणीची भूमिका साकरताना दिसून येते.
अशातच श्रिया लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.
'ताजा खबर' या नव्या वेब सीरिजमधून श्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या वेब सिरिजमध्ये ती सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.
श्रियाचा नवा आणि अनोखा अंदाज पाहून चाहते तिच्या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहेत.
श्रियाची 'ताजा खबर' वेब सिरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
6 जानेवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.