सनी लिओनी
मुंबई, 04 फेब्रुवारी : अभिनेत्री सनी लिओनी कायम चर्चेत असते. तिच्या दिलखेचक अदांनी ती चाहत्यांना घायाळ करते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सनी लिओनी मणिपूरमधील इंफाळ येथे एका फॅशन शो मध्ये सहभागी होणार होती. मात्र तिथे एक धक्कादायक घटना घडली. मणिपूरमधील इंफाळ येथे एका फॅशन शो होणार होता, त्याठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. शोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळमध्ये शनिवारी एका फॅशन शो कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. या कार्यक्रमात सनी लिओनी सहभागी होणार होती. कांगजीबंग परिसरात हा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट कार्यक्रमाच्या स्थळापासून १०० मीटर दूर अंतरावर सकाळी साडे छहा वाजण्याच्या सुमारास झाला. आतापर्यंत कुठल्याही अतिरेकी संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. हेही वाचा - Sidharth-Kiara Wedding : ‘त्या’ ठिकाणी पहिल्यांदा भेटलेले सिद्धार्थ-कियारा; ब्रेकअपपर्यंत आलेलं नातं कसं पोहोचलं लग्नापर्यंत इंफाळच्या माजी एसपी महारबम प्रदीप सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. आम्हाला संशय आहे की, हे चीनी ग्रेनेड सारखं स्फोटक उपकरण आहे, ज्यामुळे स्फोट झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्फोटानंतर पोलीस कमांडोंच्या पथकाने घटनास्थळाच्या आसपास शोध मोहीम सुरू केली. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नाही.
सनी लिओन ही 41 वर्षांची कॅनेडियन-अमेरिकन-भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती इंफाळमधील हाऊस ऑफ अली फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करण्यासाठी आणि हट्टा येथे हातमाग- खादी उद्योगाला आणि मणिपूरमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे उपस्थित राहणार होती. या शो मध्ये सनी लिओनीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमणार होती. अनेकांनी तिकिटांची खरेदी केली होती. त्यामुळे सध्या मोठी जीवितहानी टळली आहे असे म्हणावे लागेल.