मुंबई, 14 जून : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अशातच नुकतीच प्रदर्शित झालेली हृतिक रोशन आणि बर्गर किंगची जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीने सगळ्या लोकांना गोंधळात टाकले आहे. (Confusion over Hrithik Roshan’s new ad) हॅम्बर्गर फास्ट-फूड चेनच्या ‘जुगाड’ जाहिरातीने ऑनलाइन खळबळ उडवून दिली. हृतिक रोशन व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताच, स्टुडिओमध्ये जाण्यापूर्वी छायाचित्रकारांना पोझ दिली. हृतिक ही पोझ देत असताना बर्गर किंगने त्याच्या मागे ‘रु 50 स्टनर मेनू’ चा बोर्ड उभा केला. जेणे करुन तो बर्गर किंगचे समर्थन करत असल्यासारखं दिसावं. मात्र हृतिकनं यावर एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली.
12 जून रोजी हृतिकनं या जाहिरातीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला, “@burgerkingindia, हे केले नाही.” हृतिकने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बर्गर किंगच्या स्टनर मेनूची जाहिरात करणारे छोटे व्हिडिओ पोस्ट केले, त्याला सहयोग म्हणून हॅश-टॅगही दिले. @BurgerKingIndia ते छान नाही, मात्र एक अनोखी आफ्टरटेस्ट सोडली आहे, असं म्हणत हृतिकनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला. #collab असाही टॅग दिलेला पहायला मिळाला. त्यामुळे चाहते आणखीनंच संभ्रमात पडले.
लोकांना पहिल्यांदा वाटलं की, हृतिकनं हा व्हिडिओ नाही बनवला. मात्र त्यानं व्हिडीओ शेअर केल्यावर हा एक जाहिरातीचाच भाग होता हे समजलं. अशा अनोख्या संकल्पनेमुळे लोकांची जाहितीकडची उस्तुकता आणखीनच वाढली आणि हृतिकच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हृतिकच्या पोस्टला 424,879 लाईक्स मिळाले आहेत. बर्गर किंगनेही हे व्हिडिओ ट्विट केले होते.