JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Sardar Udham'फेम बनिता संधू 3 वर्षे होती डिप्रेशनमध्ये;अभिनेत्रीने अशी केली मात

'Sardar Udham'फेम बनिता संधू 3 वर्षे होती डिप्रेशनमध्ये;अभिनेत्रीने अशी केली मात

अभिनेत्री बनिता संधूने (Banita Sandhu) शुजित सरकारच्या ‘ऑक्टोबर’(October) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,24ऑक्टोबर-  अभिनेत्री बनिता संधूने (Banita Sandhu) शुजित सरकारच्या ‘ऑक्टोबर**’(October)** चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वरुण धवनसोबतच्या(Varun Dhawan) तिच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. शुजितच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सरदार उधम’मध्ये तिने उधम सिंगची प्रेयसी  रेश्माची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की नैराश्याने तिला लॉकडाऊनशी संबंधित तणावाशी कसं  वागावं  हे शिकवलं  आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्यासोबत काय झालं  हे बनिताने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

बनिता संधूने सांगितलं की, तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी विद्यापीठात परतली होती.  परंतु त्यावेळी मानसिक तणावामुळे तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. म्हणून, तिने तिच्या  मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बॉलिवूडमधून एक वर्षाचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता . तिचा ‘ऑक्टोबर’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ती विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाला होती. शोबीजमध्ये पदार्पण केल्यानं  तिच्यावर खूप प्रभाव पडला होता.ती आपल्या बॉलिवूड करिअरबद्दल निश्चित नव्हती. (**हे वाचा:** VIDEO:‘माझं नाव घेऊ नको’ अनन्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन जाणारा ईशान खट्टर ट्रोल ) अभिनेत्री म्हणते की ती कधीच चर्चेत राहण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी किंवा पुरस्काराच्या मागे धावण्यासाठी आलेली  नाही. तर अभिनयावरील प्रेमानेच तिला  या व्यवसायात ओढलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती नैराश्याशी कशी झुंज देत आहे. हे तिनं सांगितलं परंतु विशेष बाब म्हणजे बनिताने  सर्व प्रकारच्या ताणतणावांना हाताळण्याची एक खास कला आत्मसात केली आहे. (**हे वाचा:** तमिळ चित्रपट ‘Koozhangal’ ऑस्करपासून फक्त दोन पावले दूर; भारताकडून अधिकृत निवड ) कोरोना महामारीतील कठीण काळ- अभिनेत्री पुढे म्हणाली की इतर सर्वांप्रमाणेच, कोविड -19 साथीच्या आजाराने तिच्यावरही परिणाम केला होता. यामुळे तिची कारकीर्द मंदावली होती. परंतु ती स्वतःला भाग्यवान मानते की ती आणि तिचे कुटुंब त्या कठीण काळातून बाहेर पडू शकले. करमणूक उद्योगात परिस्थिती पूर्वपदावर आल्याने बनिता आपल्या कामाबद्दल निश्चिंत झाली आहे. आता चित्रपटगृहे खुली राहतील आणि आम्हाला पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागणार नाही, अशी अपेक्षा अभिनेत्रीने व्यक्त केली  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या