मुंबई, 29 जून- ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटामुळे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) प्रचंड चर्चेत आला होता. त्याच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं होतं. या चित्रपटानंतरसुद्धा अभिनेता सतत चर्चेत असतो. प्रसादने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. आजही अभिनेत्याने अशीच एक खास पोस्ट लिहली आहे. ही पोस्ट त्याने आपला मित्र आणि प्रसिद्ध विनोदवीर समीर चौगुलेसाठी लिहली आहे. वास्तविक आज समीर चौगुले यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत प्रसादने ही पोस्ट लिहली आहे. समीर चौगुले सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये सर्वांना हसवून लोटपोट करण्याचं काम करत आहे. याच कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. प्रसाद ओक पोस्ट- समीर चौघुले… “मोठ्ठा” हो….. “मोठ्ठी” उंची गाठ. आमचा अत्यंत लाडका अभिनेता आणि सच्चा मित्र…!!! वाढदिवसाच्या अनंत कोटी..शुभेच्छा मित्रा…!!! **(हे वाचा:** BBM फेम मीरा जग्गनाथ बनणार शेफ; कुकिंग शोमध्ये लावणार हजेरी )
“एखाद्या अभिनेत्याच्या तोंडची वाक्यं एवढी प्रसिद्ध व्हावीत… कि त्या वाक्यांचा brand बनावा आणि त्याचे T-shirts यावेत. " हे असं काही या आधी कधीही मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं मला तरी माहिती नाही. या बद्दल समीर चं प्रचंड अभिनंदन…!!! आणि या साठी @pulaanimandali यांनी जे काही केलंय त्याचंही खूप खूप कौतुक…!!!सम्या… उत्तरोत्तर तुला अशी खूप खूप धमाल वाक्यं सुचो… त्याचे हजारो T-shirts बनो आणि ते घालण्याची आणि तुझी वाक्यं छातीवर अभिमानाने मिरवण्याची संधी आम्हा पामरांना वारंवार मिळो हीच प्रार्थना…!!!!HAPPY BIRTHDAY