JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: 13 वर्षानंतर स्मृती इराणींची होणार छोड्या पडद्यावर पुन्हा एंट्री? एकता कपूरने दिली HINT

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: 13 वर्षानंतर स्मृती इराणींची होणार छोड्या पडद्यावर पुन्हा एंट्री? एकता कपूरने दिली HINT

टीव्ही क्वीन एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या शोने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक तोडले आहे. या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने स्मृती इरणी(Smriti Irani)) या घरा घरात पोहचल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी- टीव्ही क्वीन एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या शोने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक तोडले आहे. या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने स्मृती इरणी**(Smriti Irani))** या घरा घरात पोहचल्या. तुलसी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत अमर उपाध्यायसोबत (Amar Upadhyay) तुलसीला पाहण्यासाठी लोक टीव्ही समोरून हालत नसे. या मालिकेशी शोच्या निर्मात्यासहा कलाकारांच्या देखील काही आठवणी आहेत. आता एकताने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. ही मालिका पुन्हा टीव्हीवर टेलीकास्ट करण्यात येणार असल्याची माहिती तिनं दिली आहे. आता पुन्हा पाहा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिका एकता कपूरने इनस्टावर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आज मी मागे वळून पाहते तेव्हा प्रत्येक क्षणाची आठवण होते. ज्यामुळे या मालिकेला सर्वांनी डोक्यावर घेतले. त्याच प्रेमाने या प्रवासात पुन्हा आमची साथ द्या. बुधवारपासून दररोज सांयकाळी पाच वाजता फक्त स्टार प्लसवर…असं म्हणतं एकताने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. वाचा-  ‘गाड़ी वाला आया कचरा निकाल’ रस्त्यावर कचरा उचलताना दिसली अभिनेत्री एकता कपूरला आठवले जुने दिवस यासोबत एकता कपूरने स्मृती इरणी, रोनित बोस रॉय आणि अमर उपाध्याय यांना टॅग करत म्हटलं आहे की, इतक्या वर्षांनी हा प्रोमो पाहून कसं वाटलं? एकताने हा प्रोमो शेअर करताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या आनंदाला मर्यादाच उरलेल्या नाहीत. काहींने कमेंट करत म्हटलं आहे की, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

संबंधित बातम्या

स्मृती इरणी यांना मिळाली ओळख ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेने टीव्ही जगतात इतिहास केला आहे. 2000 ते 2008 पर्यंत या मालिकेचा टेलीकास्ट सुरू होता. प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने अतुट नाते निर्माण केले होते. आजही ते नाते कायम आहे. या मालिकेमुळे स्मृती इरणी यांना तुलसी ही ओळख मिळाली. वाचा-  अर्जुन कपूरने मलायका अरोराला केलं ट्रोल,अभिनेत्रीची अशी होती प्रतिक्रिया स्टार प्लसवर प्रसारित होणारी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका भारतीय टीव्ही विश्वातील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका असल्याचे सांगितले जाते. या मालिकेची लोकप्रियता इतकी होती की श्रीलंकासारख्या देशात लोकल भाषेत ही मालिका डब करून पाहिली गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या