मुंबई, 9 एप्रिल- ‘एक हजारों मैं मेरी बेहेना है’ (Ek Hajaron Mai Meri Behena Hai) फेम छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा (Krystle D’souza ) आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी बोलते. तिला आपली प्रत्येक गोष्ट खाजगी ठेवायला आवडते. तरीसुद्धा ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार असा अंदाज बांधला जात आहे की, क्रिस्टल डिसूझा एका गुलाम गौस दिवानी (Gulaam Gouse Deewani) या व्यक्तीला डेट करत आहे. जो एक रेस्टोरंट उद्योजक आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, क्रिस्टल आणि गुलाम गेल्या 6 महिन्यांपासून एकत्र आहेत. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघे सतत एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.क्रिस्टल डिसूझा आणि गुलाम गौस यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. हे फोटो गुलाम गौस यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. तर दुसरीकडे क्रिस्टल डिसूझानेही गुलाम गौस याच्यासोबत मजामस्ती करतानाचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर क्रिस्टल डिसूझा आणि गुलाम गौस यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. गुलाम गौसने 6 दिवसांपूर्वी हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये क्रिस्टल त्याच्यासोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत गुलाम गौसने कॅप्शनमध्ये लिहिलंय- ‘‘हास्य, प्रेम, मैत्री, आठवणी’’. गुलामने या व्हिडिओमध्ये क्रिस्टल डिसूझासोबतच अभिनेता रित्विक धनजानी आणि प्रियांका तालुकदार यांना टॅग केलं आहे. व्हिडिओमध्ये ऋत्विक धनजानी आणि प्रियांका तालुकदारही दिसत आहेत. कारण ते दोघेही त्यांच्यासोबत धम्माल करताना पाहायला मिळत आहेत.