आलिया भट्ट-रणबीर कपूर
मुंबई, 24 ऑक्टोबर- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टी दिली आहे. क्रिती सेनन, एकता कपूरपासून ते मनीष मल्होत्रापर्यंत अनेक सेलेब्रेटींनी आपल्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अशा परिस्थितीत कपूर कुटुंबीयांकडूनही दिवाळी पार्टीचं आयोजन होईल, अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. अलीकडेच रणबीर कपूरने सांगितले की, लग्नानंतर आई बनणाऱ्या आलिया भट्टसोबत आपली पहिली दिवाळी कशी सेलिब्रेट करणार आहे. आणि यासोबतच यावेळी त्यांच्या घरी दिवाळीची पार्टी का झाली नाही याबाबतही अभिनेत्याने खुलासा केला आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ओळखलं जातं. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांबाबत सतत लहान-लहान अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. रणबीर कपूर सध्या गर्भवती आलिया भट्टची पूर्ण काळजी घेत आहे. अलीकडेच अभिनेत्याने पिंकविलासोबत दिवाळी पार्टीबद्दल चर्चा केली. यावेळी बोलताना रणबीरने म्हटलं, “आमच्या कुटुंबातील अनेकांना आता अशा प्रकारच्या पार्टीचा भाग व्हायचं नाहीय म्हणून आम्ही शांततेत उत्सव साजरा करत आहोत. आम्ही आमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना दिवाळीच्या निमित्ताने भेटत आहोत पण कोणत्याही पार्टीचा भाग नाहीय. (हे वाचा: Diwali 2022: दिवाळी पार्ट्यांमधून दीपिका-रणवीर गायब; पुन्हा विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण **)** या मुलाखतीदरम्यान अभिनेता रणबीर कपूरला दिवाळीच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आलं होतं. याबाबत उत्तर देत रणबीरने म्हटलं, ‘आम्ही दीदी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. त्यांनी सर्व कुटुंबीयांना दिवाळीनिमित्तआपल्या घरी बोलावलं होतं. कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिथेच दिवाळी साजरी केलीय. रणबीर पुढे म्हणाला, असं असलं तरी, जेव्हा सर्व कुटुंबीय एकत्र येतात तेव्हा तीच आपल्यासाठी पार्टीसारखी असते.रणबीर आपल्या कुटुंबाच्या आणि सर्व बहिणींच्या फारच आहे. मीडियापासून दूर असला तरी सतत त्यांच्यासोबतच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. रणबीर हा सर्व बहिणींचा लाडका भाऊ आहे. त्याला रिद्धिमा ही सख्खी बहीण आहे. तर करिश्मा आणि करीना या चुलत बहिणी आहेत. परंतु यांचं बॉन्डिंग फारच छान आहे.
रणबीर कपूर सध्या गर्भवती आलियाच्या तब्येतीवर पूर्ण लक्ष देत आहे. यामुळे दोघेही दिवाळी पार्टीमध्ये दिसून येत नाहीत. रणबीरनेही आलियासोबत वेळ घालवण्यासाठी त्याच्या कामाच्या कमिटमेंटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयुष्मान खुराना, क्रिती सेनॉन, भूमी पेडणेकर, तापसी पन्नू, मनीष मल्होत्रा, एकता कपूर इत्यादी अनेक सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान अनेक सेलेब्रेटींनी सुंदर अशा ट्रॅडिशनल अंदाजात या पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. या दिवाळी पार्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ