मुंबई, 30 नोव्हेंबर : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची भूमिका साकरणारी अभिनेत्री दिशा वकानी 2017 पासून या शोमध्ये दिसलेली नाही. मॅटरनिटी लिव्हवर गेलेली दिशा अद्याप या शोमध्ये परतलेली नाही. मागच्या काही काळापासून तिच्या कमबॅकच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र प्रेक्षकांच्या पदरी निराशेव्यतिरिक्त आणखी काहीच पडलं नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिशा वकानी ‘तारक मेहता…’मध्ये परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण त्यातही एक ट्वीस्ट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘तारक मेहता…’ची मुख्य अभिनेत्री दिशा वकानी एका एपिसोडसाठी या शोमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी एपिसोडमध्ये बागा जेठालालना त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगणार आहे. बागाच्या स्वप्नानुसार जेठालाल आजारी पडून अंथरुणाला खिळणार आहे. यासोबत जेठालालना घाबरवत बागा म्हणाला की माझी स्वप्न नेहमीच खरी होतात. रॅपर बादशाहने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं ‘या’ कारणामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड!
अशा परिस्थितीत जेठालाल विचार करतात की जर यावेळी माझी देखभाल करण्यासाठी तिथे असावी. जर बागाचं हे स्वप्न खरं ठरलं तर दर्शक पुन्हा एकदा दयाबेन या शोमध्ये पाहू शकतील. चाहत्यांचं म्हणणं आहे की हा मेकर्सचा दिशा वकानीच्या कमबॅक बद्दलचा इशारा आहे. दिशा वकानीच्या अनुपस्थितीत शोच्या टीआरपीवर खूप परिणाम झाला आहे. प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा
मोनिका भदोरियानंही सोडला शो दिशा वकानीनंतर ‘तारक मेहता…’मधील आणखी एका अभिनेत्रीनं शोला अलविदा केलं. बावरीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मोनिका भदोरियानं कमी मानधन मिळत असल्यानं हा शो सोडल्याचं सांगितलं. मोनिकानं मेकर्सकडे आपलं मानधन वाढवण्याची मागणी केली होती मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं ही मालिका सोडली. Dabangg 3: सलमान खानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात; #BoycottDabangg3 का होतोय ट्रेंड