JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : लॉकडाऊनध्ये दिशाचा धम्माल डान्स, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही टायगर

VIDEO : लॉकडाऊनध्ये दिशाचा धम्माल डान्स, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही टायगर

दिशाच्या डान्स व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट तर केल्याच आहेत पण टायगर श्रॉफ सुद्धा कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ तर सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेला बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिनं एक जबरदस्त डान्स व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे आणि यामागच महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे यावर टायगर श्रॉफची कमेंट. दिशा आणि टायगर श्रॉफच्या नात्याची चर्चा तर नेहमीच होताना दिसते मात्र या दोघांनी अद्याप या नात्याची कबुली दिलेली नाही. पण दोघांनीही अनेक पार्ट्यांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. एवढंच नाही तर दिशा आणि टायगर एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा अनेकदा कमेंट करताना दिसतात. याशिवाय टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ सुद्धा अनेकदा दिशाच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करताना पाहायला मिळते. दिशानं नुकत्याच शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. जेव्हा ‘गे’ म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता करण, सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिशानं लिहिलं, ‘बियॉन्से वाइब्स सुरू आहेत.’ दिशाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांच्या कमेंटचा तर पाऊस पडतच आहे पण टायगर श्रॉफ सुद्धा तिच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. त्यानं तिच्या या डान्स व्हिडीओवरील कमेंटमध्ये फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. टायगर श्रॉफ व्यतिरिक्त त्याची बहीण कृष्णा श्रॉफनंही दिशाच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट केली आहे आणि विशेष म्हणजे दिशानं या दोघांनाही हार्ट इमोजी पोस्ट करत रिप्लाय दिला आहे. दिशा आणि टायगरच्या नात्याबद्दल बोलायचं तर दिशानं तो तिचा खूप जवळचा मित्र असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय त्याला अनेकदा इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला माझ्याबद्दल असं काही वाटत नाही असंही एका मुलाखतीत म्हटलं होतं. तर टायगरनं मी तिच्या बरोबरीचा नाही असं म्हणतं या नात्याच्या प्रश्नांना पूर्णविराम दिला होता. मात्र सोशल मीडियावर या दोघांचं स्पेशल बॉन्डिंग कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. ‘बिग बॉस’नंतर बदलला रश्मि देसाईचा अंदाज, लॉकडाऊनमध्ये केलं BOLD फोटोशूट राम कपूरनं दिला होता सर्वात मोठा इंटिमेट सीन, 17 मिनिटांचा Video झाला होता Viral

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या