JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टायगरची गर्लफ्रेंड शोभते, दिशा पाटनीचा वर्कआउटचा भन्नाट VIDEO पाहिलात का?

टायगरची गर्लफ्रेंड शोभते, दिशा पाटनीचा वर्कआउटचा भन्नाट VIDEO पाहिलात का?

Disha Patani या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे दिसून येत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : अभिनेत्री दिशा पाटनी मागच्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. मात्र आता या दोघांचंही ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. यानंतर दिशा आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मीडिया सक्रिय असणाऱ्या दिशानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे तिचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे दिसून येत. तसं पाहायला गेलं तर ती तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते मात्र हा व्हिडिओ खूप वेगळा आहे. VIDEO: असं काय झालं की सिद्धार्थ जाधव सईला म्हणाला, ‘तुम तो धोकेबाज हो’ दिशानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका हातानं कार्टव्हील करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना दिशानं त्याला, ‘बऱ्याच काळानंतर माझ्या ट्रेनरकडून ट्रेनिंग घेत आहे.’ असं कॅप्शन दिलं आहे. दिशाचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावर चाहते तिला अ‍ॅथलेटिक जिम्नॅस्टिक सुरू करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. टायटॅनिकचा अभिनेता चेन्नईच्या मदतीला आला धावून, केली ‘ही’ कमेंट

काही दिवसांपूर्वी दिशानं एक डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तिच्यासोबत तिची मैत्रिणही डान्स करताना दिसत होती. दिशाची महत्वाची भूमिका असलेला भारत सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या सिनेमानं जवळपास 200 कोटींची कमाई केली. यामधील दिशाच्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. संसदेत मोदींनी ऐकवला शेर, तर अख्तरांनी दिला ‘हा’ खास सल्ला

सध्या दिशा तिचा आगामी सिनेमा मलंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या एक स्टंट सीन करताना दिशाला दुखापतही झाली होती. या सिनेमात दिशासोबत आदित्य रॉय कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाच दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. ============================================================ अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या