आदिपुरुष टीझर
मुंबई, 3 ऑक्टोबर : भारतात बाहुबली अशी ओळख अभिनेता म्हणजेच प्रभास. बाहुबलींनंतर प्रभासने अतिशय मोजकेच चित्रपट केले आहेत. पण त्यातील त्याच्या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. आता प्रभास पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. ‘ आदिपुरुष ’ असं या चित्रपटाचं नाव असून हा रामायणावर आधारित असणारा सिनेमा आहे. या चित्रपटांचीही घोषणा झाल्यापासून याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आधीच प्रभासचा सिनेमा त्यात रामायणावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीच क्रेझ निर्माण झाली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सिनेमा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण टीझर पाहून लोक सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. नक्की काय आहे त्याचं कारण जाणून घ्या. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सॅनॉन स्टारर आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर रविवारी अयोध्येत एका मेगा इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला. मात्र हा टीझर पाहून नेटिझन्स निराश झाले आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष मध्ये प्रभास भगवान राम तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या चित्रपटातील दोघांचे लुक चाहत्यांना पसंत पडलेले नाहीत. सैफला रावणाच्या भूमिकेत पाहून तो चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार कि अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणार असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. याबद्दल प्रचंड मिम्स सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहेत. हेही वाचा - Adipurush: ‘आदिपुरुष’ मध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली ‘आमचा चित्रपट येतोय’! आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या टीझरमधील VFX ला ट्रोल केलं आहे. काहींनी या टीझरची तुलना टेम्पल रन या गेमसोबत केली तर या टीझरमध्ये खराब VFX वापरण्यात आले आहेत, असं काहींचे मत आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरबाबत अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर केल्या आहेत. या ट्वीटमध्ये एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘खराब VFX, व्हिडीओ गेमसारखं दिसत आहे.’ त्यासोबतच चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.
टीझरमधील रावणाच्या पुष्पक विमानाच्या चित्रणालाही नेटिझन्सट्रोल करत आहेत. काही लोक म्हणाले की या चित्रपटापेक्षा ऍनिमेटेड कार्टून चांगले असतात. त्याचबरोबर यावेळी चाहत्यांना रामानंद सागर यांच्या रामायणाची देखील आठवण झाली.या दोघांची तुलना सध्या केली जात आहे. खराब लूक आणि VFX बद्दल तक्रार करत नेटिझन्स पुढे म्हणाले की आदिपुरुष हा रामायणाचा अपमान आहे. “सर @omraut जेव्हा तुम्ही एखाद्या महाकथेला चित्रपटात रूपांतरित करता; प्रत्येक पात्राला मुख्य मुख्य पात्रांप्रमाणेच मूल्यवान समजा. हनुमान जी इतके वाईट का चित्रित केले गेले आहे ? #DisappointingAdipurish," असे ट्विट एका चाहत्याने केले आहे.
आदिपुरुष या चित्रपटाच्या VFX साठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनन ही सिता आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.