SS Rajamouli म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा! हे आहेत RRR दिग्दर्शकाचे सुपरहिट चित्रपट

एस. एस. राजामौली हे भारतातले अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक असून, त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेले सर्वच सिनेमे हिट झाले आहेत.

राजामौलींचा RRR हा नवा मल्टिस्टारर सिनेमा 25 मार्चला रिलीज झाला असून, तो कोणते विक्रम करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

RRR ने अपेक्षेप्रमाणे दमदार सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जगभरात तब्बल 223 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

RRR ने 'बाहुबली 2'चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला आहे.

यातील ज्युनियर NTR आणि राम चरण या जोडीची 'Naatu Naatu', 'Etthara jenda' ही गाणी सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाली आहेत.

RRRमधला ज्युनियर NTR चा एंट्री सीन पाहून फॅन्सना स्वतःवर नियंत्रण ठेवणं अवघड जात आहे, इतके ते एक्साइट होत आहेत.

राजामौलींच्या 'बाहुबली' सीरिजमधल्या दोन्ही सिनेमांनी (2015 आणि 2017) अनेक विक्रम केले, पुरस्कार मिळवले आणि प्रभास देशभर हिट ठरला

राजामौलींचा पहिला सिनेमा होता 'स्टुडंट नंबर 1.' 2001 सालच्या या सिनेमातून ज्युनिअर एनटीआरने Debut केला. तो सिनेमा हिट झाला.

2004 सालचा सॉय सिनेमाही हिट झाला. त्यामुळे तेलुगू अभिनेता नितीन सुपरस्टार झाला. तत्पूर्वी 2003 सिम्हाद्री हा सिनेमाही चांगला चालला होता.

राजमौलींच्या 2006 सालच्या 'विक्रमार्कुडु' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 118 कोटींची कमाई केली.  या सिनेमामुळे अभिनेता रवी तेजाला नवी ओळख मिळाली.

2007चा 'यामाडोंगा' हा ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट ठरला. त्यात ज्युनिअर NTR, मोहनबाबू आणि प्रियामणी होते. 

2010 'मर्यादा रामण्णा' हा चित्रपट हिट झाल्यावर त्याचे अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आले.

बाहुबलीमुळे प्रसिद्ध झालेला प्रभास त्याआधी राजामौलींच्या छत्रपती (2005) या सिनेमात झळकला होता.

2012 सालच्या 'मख्खी' (ईगा) या वेगळ्या Concept च्या चित्रपटाला 2 नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाले होते. 

'मगधीरा' या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटाने तब्बल 150 कोटींचा व्यवसाय केला आणि आणि 2 नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळवले. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?