JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

केतकी चितळेला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 14 मे- अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. केतकी चितळेला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला. केतकी चितळे प्रकरणावर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान आपल्याला असले पाहिजेत. आजकाल सोशल मीडियावर तर अतिशय खालचे शब्द वापरले जातात, अशी भाषा कुणीही वापरू नये असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नवी मुंबई येथून पोलिसांनी घेतलं केतकी चितळेला ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणं अभिनेत्री केतकी चितळेला प्रचंड महागात पडलं आहे. कारण शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिला एका रुममध्ये बसून ठेवले आहे. काही वेळातच तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. कळवा पोलीस काही वेळातच कळंबोळी पोलीस ठाण्यात पोहचणार आहेत. कळंबोली पोलीस तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या