jacqueline fernandez
मुंबई, 19 सप्टेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूडची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. त्यामुळे तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. अशातच महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलीनची दिल्ली पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. जॅकलीनला आज 19 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. पुन्हा एकदा जॅकलीनला समन्स बजावण्यात आला आहे. जॅकलिन फर्नांडिससोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिपाक्षीलाही पोलिसांनी समन्स बजावले आहे. या प्रकरणी जॅकलिनला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. ज्यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते. जॅकलीन फर्नांडिससाठी महागडे कपडे बनवण्यासाठी फॅशन डिझायनर लिपाक्षीला महाठग सुकेश चंद्रशेखरच्या वतीने पैसेही देण्यात आले होते. त्यामुळे आज दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूने या दोघांची एकत्र चौकशी करण्याची शक्यता आहे. हेही वाचा - ‘तिचा सन्मान करायला हवा’; आलियाबद्दल असं अचानक का म्हणाला Ranbir Kapoor दरम्यान, 200 कोटींच्या खंडणीचा आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सुकेश आणखी काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात होता, असंही समोर आलंय. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलंय.