नवी दिल्ली, 2 जून : दिल्ली स्थित स्वतंत्र गायक-गीतकार आणि विविध वाद्यांची माहिती असलेला शैल सागर (Sheil Sagar) याचं बुधवारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्याचं निधन (Sheel Sagar dies at the age of 22) झालं. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सागरने ‘इफ आय ट्राइड’ या गाण्यापासून करिअरची सुरुवात केली. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं खूप कौतुक केलं गेलं. या गाण्यामुळे तो लोकप्रिय झाला होता. याशिवाय गेल्या वर्षी तीन अन्य अल्बम रिलीज झाले होते. ज्यात ‘बिफोर इट गोज’, ‘स्टिल’ आणि ‘मिस्टर मोबाइल मॅन- लाइव’ यांचा समावेश आहे. शैल सागरचं ‘मिस्टर मोबाइल मॅन-लाइव’ हे गाणं गुरुग्रामच्या द पियानो मॅन जॅज क्लबमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं आणि लाइव शूट केलं होतं.
सागरला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सागरच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. एका युजरने ट्विट करून लिहिलं आहे की, संगीतकारांसह हे काय सुरू आहे?