JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Oscar 2023 मध्ये प्रेझेंटर्स आणि परफॉर्मन्ससाठी प्रियांका चोप्रानंतर मिळाला दीपिकाला मान

Oscar 2023 मध्ये प्रेझेंटर्स आणि परफॉर्मन्ससाठी प्रियांका चोप्रानंतर मिळाला दीपिकाला मान

यंदाच्या अ‍ॅकॅडमी पुरस्कार सोहळ्यात भारताला 3 नामांकनं जाहीर झाली आहेत. तसंच यंदा या सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलीय.

जाहिरात

deepika padukone

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च :   जगभरातल्या चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांनीही या सोहळ्यात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. यंदा तर हा सोहळा भारतीयांसाठी विशेष उत्सुकतेचा असणार आहे. कारण यंदा एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग विभागात नामांकन जाहीर झालंय. याव्यतिरिक्त यंदा आणखीही काही गोष्टींसाठी भारतीयांना या सोहळ्याचं विशेष आकर्षण आहे. भारतीय सिनेमांमध्ये अनेक बदल घडत आहेत. हॉलिवूडच्या तोडीस तोड चित्रपट देण्याचा प्रयत्न होतोय. मानाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्येही ते दिसून येतंय. या सोहळ्यात भारतीय चित्रपट क्षेत्राची दखल घेतली जातेय. यंदाच्या अ‍ॅकॅडमी पुरस्कार सोहळ्यात भारताला 3 नामांकनं जाहीर झाली आहेत. तसंच यंदा या सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलीय. यंदाच्या सोहळ्यात नाटू नाटू गाण्याचा परफॉर्मन्सही होणार आहे. एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातल्या नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग या विभागात नामांकन मिळालंय. भारताला पहिल्यांदाच हे नामांकन मिळालं आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर विभागात शौनक सेन आणि अमन मान यांच्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ला नामांकन मिळालं आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या विभागात कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनित मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला नामांकन मिळालं आहे. हेही वाचा - जान्हवी कपूरचं ठरलं! तिरुपतीत लग्न, असा असणार लग्नाचा वेन्यू; अभिनेत्रीनं सांगितला वेडिंग प्लान यंदाच्या ऑस्कर प्रेझेंटर्समध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा समावेश असणार आहे. मॉडेल पर्सिस खंबाटा (1980) आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (2016) यांच्यानंतर दीपिका तिसरी भारतीय प्रेझेंटर असेल. यंदा ऑस्करच्या प्री-शोमध्ये अभिनेते व विनोदी कलाकार लिली सिंग को-होस्ट असणार आहेत. ऑस्करच्या रेड कार्पेटवर कलाकारांशी संवाद साधण्याचं काम ते करताना दिसतील.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा नाटू नाटू गाण्याला नामांकन आहेच. शिवाय या गाण्यावर एक परफॉर्मन्सही असणार आहे. या गाण्यातले मुख्य कलाकार राहुल सिपलीगंज आणि काल भैरव हे गाणं सादर करणार आहेत. या गाण्यासाठी काम केलेली सर्व टीम या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या गाण्याला एम. एम. किरवाणी यांनी संगीत दिलंय, तर चंद्र बोस यांनी गाणं लिहिलंय. ‘आरआरआर’ चित्रपटाला याआधी बेस्ट फॉरीन फिल्म या विभागात काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याशिवाय नाटू नाटू गाण्यालाही पुरस्कार मिळाले आहेत. आता या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळतो का, याकडे भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या