JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया

VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया

दिपिकानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती बास्केटबॉल खेळताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण एक चांगली बॅडमिंटन प्लेअर आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. तिनं नॅशनल लेव्हल पर्यंतच्या बॅडमिंटन मॅचही खेळल्या आहेत. पण ती एक चांगली बास्केटबॉल प्लेअर सुद्धा आहे हे मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या एका व्हिडिओमुळे समजलं. हा व्हिडिओ दीपिकानं स्वतःच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात ती बास्केटबॉल कोर्टवर रिलॅक्स मूडमध्ये बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. दिपिकानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती एका चांगल्या बास्केटबॉल खेळाडूप्रमाणे खेळताना दिसत आहे. यारूनच ती बॅडमिंटनशिवाय बास्केबॉल खेळण्यातही परफेक्ट आहे असं दिसतं. या व्हिडिओमध्ये ती बॉल घेऊन बास्केटकडे जाते आणि एक उंच उडी मारून तो बॉल बास्केटमध्ये टाकते. हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामुळे तो जास्त इंप्रेसिव्ह वाटत आहे. दीपिकाच्या या व्हिडिओवर पती रणवीर सिंहनं लगेच ‘बॅलिन’ (BALLIN)अशी कमेंट केली आहे. याशिवाय इतर चाहत्यांच्याही वेगवेगळ्या कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

Birthday Special: लिप सर्जरीमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा, नेटीझन्स म्हणाले… हा व्हिडिओ शेअर करताना दीपिकानं लिहिलं, ‘फक्त काम आणि कोणताही खेळ नाही… अचानक खेळण्यासाठी मोकळा वेळ मिळाला.’ दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण भारताचे माजी बॅडमिंटनपटू आहेत. 1980मध्ये ते जगातील नंबर वन खेळाडू बनले होते. ऑल इंग्लंड ओपन चँपियनशिप जिंकणारे प्रकाश पदुकोण हे भारताचे पहिले खेळाडू होते. दीपिकानंही आपल्या वडीलांकडून बॅडमिंटनचे धडे घेतले आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे देणारी दीपिका पदुकोण फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर्कआउट करतानाचे तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. सध्या ती मेधना गुलजारच्या ‘छपाक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमाचं शूटिंग सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे. या सिनेमाची कथा अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या संघर्षावर आधारित असून दीपिका यात लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारत आहे. फत्तेशिकस्तमधून दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं भारतातलं पहिलं सर्जिकल स्ट्राइक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या