JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...अन् रणवीर सिंहची पत्नी असल्याचं सांगायला विसरली दीपिका पदुकोण

...अन् रणवीर सिंहची पत्नी असल्याचं सांगायला विसरली दीपिका पदुकोण

नुकत्याच एका इव्हेंटमध्ये दीपिकानं ती मुलगी, बहीण आणि अभिनेत्री असल्याचं नमुद केलं मात्र रणवीरची पत्नी आहे हे बोलायचं विसरली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 15 सप्टेंबरला ‘Live Laugh Love’ या एनजीओच्या दिल्ली येथे पार पडलेल्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला दीपिकानं हजेरी लावली. यामध्ये तिनं तिच्या पर्सनल लाइफ बद्दल अनेक खुलासे केले. या इव्हेंटमध्ये तिनं ती मुलगी, बहीण आणि अभिनेत्री असल्याचं नमुद केलं मात्र रणवीरची पत्नी आहे हे बोलायचं विसरली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मानसिक तणावाशी लढणाऱ्या लोकांसाठी दीपिकानं 2015 मध्ये ‘Live Laugh Love’ची स्थापना केली होती. या संस्थेच्या नव्या लेक्चर सीरिजच्या लॉन्चला दीपिका तिचे आई-बाबा आणि बहीणीसोबत पोहोचली होती. लोकांच्या मानसिक तणावाबद्दल बोलताना तिनं आपल्या रिअल लाइफमधील सर्व भूमिका मांडल्या. या इव्हेंटमध्ये बोलताना दीपिका म्हणाली, मी एक मुलगी आहे, बहीण आहे, अभिनेत्री आहे. एवढं बोलून झाल्यानंतर कोणीतरी तिला मागून पत्नी असल्याची आठवण करून दिली. बॉयफ्रेंडसोबत यॉर्टवर Romantic झाली सुश्मिता सेन, चाहत्यांनी दिल्या HOT कमेंट

यावर दीपिकानं आपली लाइन हसत हसत पूर्ण केली. …आणि हो मी एक पत्नी सुद्धा आहे. अरे देवा मी विसरलेच होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मियावर खूप व्हायरल होत आहे. या इव्हेंटला दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिशा हे सुद्धा उपस्थित होते. दीपिकानं स्वतःही मानसिक तणावाचा सामना केला असून याचा उल्लेख तिनं अनेकदा केला आहे. यातून पूर्ण बरी झाल्यानंतर तिनं 2015 मध्ये या एनजीओची स्थापना केली होती. त्याला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. आलियासोबतच्या किसिंगला घाबरला सलमान, ‘इंशा अल्लाह’मधून घेतली माघार!

जाहिरात

दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रावालची भूमिका साकारत आहे. याशिवाय पती रणवीर सिंह सोबतही ती ‘83’मध्ये दिसणार आहे. यात ती रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. श्वेता तिवारीच्या मुलीचा बाथरूम VIDEO होतोय VIRAL ============================================================ CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या