मुंबई, 23 मार्च : चीनमधून सुरू झालेला कोरोना इटली, इराण तसंच स्पेननंतर भारतातही फोफावू लागला आहे. भारतामध्ये प्रसिद्ध गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जगभरातही अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. टॉम हँक्स, इंदिरा वर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. आता या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये आणखी एक नाव जोडलं गेले आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. याबरोबर तिने खूप मोठी पोस्ट लिहून तिच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. हॉलिवूड अभिनेत्री डेबी मजार (Debi Mazar) या अभिनेत्रीला कोरोना झाला आहे. (हे वाचा- दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव ) डेबी मजारने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिने दिलेल्या या माहितीनंतर डेबीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला कोरोना झाल्याने सर्वजण चिंतीत आहेत. 5 दिवसांपासून डेबी कोरोना पॉझिटिव्ह आहे.
दरम्यान डेबीने सध्या ती ठीक असल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ सुरू असल्याचंही ती म्हणाली.