दिशा वकानीच्या कमबॅकसाठी चाहते उत्सुक
मुंबई, 18 जुलै - तारक मेहता का उल्टा चष्मा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ही मालिका सतत कोणत्या कोणत्या कारणामुळं चर्चेत आहे. मागील काही दिवसात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. नुसती मालिका सोडलेली नाही तर मालिकेवर काही आरोप लावले आहेत. अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे.आता या सर्व आरोपांच्या सत्रात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सगळ्यांची लाडकी दयाबेन मालिकेत परतत आहे. दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही. एका एपिसोडमध्ये ती एकदाच दिसली होती. चाहते तिला खूप मिस करत आहेत. मध्यंतरी दिशा वकानीने शो सोडल्याचे वृत्त होते आणि निर्माते तिच्या जागी नवीन चेहरा शोधत आहेत. मात्र, आता दिशा वकानी शोमध्ये परत येऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. वाचा- संजय दत्तची एक चूक अन् आदित्य पंचोली झाला स्टार, पाक क्रिकटरचं तर आयुष्यचं बदललं पिंकविलाच्या बातमीनुसार, दिशा वकानी यावर्षी दिवाळीपर्यंत शोमध्ये परत येऊ शकते. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा शोच्या ताज्या कथानकाबद्दल सांगायचे तर जेठालाल दयाबेनला खूप मिस करत आहेत. त्याला दयाला परत गोकुळधाममध्ये पहायची आहे. जेठालाल दया परतण्याबाबत ठाम आहे. यावर सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दयाभाभी म्हणजेच दिशा वाकानी पुन्हा शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. जेनिफर मिस्त्रीव्यतिरिक्त मोनिका भदोरियानेही मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले होते.