दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे झायरा वसीम.
मुंबई, 29 मे : दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे झायरा वसीम. तिने काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडली असल्याची घोषणा केली होती. तिने चित्रपटसृष्टी सोडली असली तरी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असते. इस्लामच्या निगडित मुद्द्यांवर ती खुलेपणानं बोलत असते. गेल्या वर्षी कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून झालेल्या वादाच्या वेळी तिने पुढे येऊन आपले मत मांडले होते. आता तिने केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. या ट्विटमध्ये नकाब घालून जेवण जेवणाऱ्या मुलीचा फोटो पोस्ट करत तिने मांडलेलं एक मत चर्चेत आलं आहे. ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीनं एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक मुस्लिम मुलगी नकाब चेहऱ्यावर असताना तो न हटवता जेवण जेवत आहे. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने ‘ही माणसाची निवड आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. हेच ट्विट रिशेअर करत झायराने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. हा फोटो रिट्विट करत तिने लिहिलंय की, ‘मी नुकतीच एका लग्नाला गेले होते. मी पण या मुलीसारखंच जेवण जेवले. माझ्या सभोवतालचे सगळे जण नकाब काढून जेवण जेवण्यासाठी मला आग्रह करत होते. पण मी तसं केलं नाही. ही स्पष्टपणे माझी स्वतःची निवड होती. आम्ही हे तुमच्यासाठी करत नाही, त्याला सामोरे जायला शिका.’ असं म्हणत तिने स्पष्ट शब्दात ट्विट केलं आहे.
झायरा वसीमने केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. झायराच्या अनेक फॉलोअर्सनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. काहींनी झायराच्या या ट्वीटनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी मात्र तिच्यावर टीका केली आहे. ‘चित्रपटामुळे कोणी दुखावलं जात असेल तर…’ ‘द केरळ स्टोरी’ बद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीचे वक्तव्य चर्चेत यापूर्वी हिजाबच्या मुद्द्यावरून झायरा वसीमने कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आल्यावर टीका केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘वारशात मिळालेला हिजाब ही निवड आहे, त्यामुळे ही चुकीची माहिती आहे. हा एक प्रकारचा समज आहे जो सोयीनुसार बनवला गेला आहे.
तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून जबाबदारी आहे. हिजाब परिधान करणारी स्त्री तिच्या प्रिय व्यक्तीने तिला दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. मी देखील ते कृतज्ञता आणि आदराने परिधान करतो. धर्माच्या नावाखाली महिलांना असे करण्यापासून रोखले जात असलेल्या या व्यवस्थेला माझा विरोध आहे. मुस्लीम महिलांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडावा किंवा सोडून द्या, हे अन्यायकारक आहे.