दादा कोंडके
मुंबई, 24 मे : ज्येष्ठ मराठी अभिनेते दादा कोंडके यांना कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी त्यांच्या काळात जनमानावर अधिराज्य केलं. 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं होतं. सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा भविष्यात मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ठरला. मोठा भाऊ या नात्यांने सिनेसृष्टी आणि चाहते त्यांना दादा म्हणूनच हाक मारायचे. यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडकेच लावायला सुरुवात केली. पण आयुष्यभर प्रसिद्धी मिळवलेल्या दादांच्या मृत्यूबाबतचं ती गोष्ट आजही गूढच आहे. दादांनी नेहमी एकाच टीमसोबत काम केलं. त्यांच्या सिनेमांत अभिनेते, तंत्रज्ञ आणि पार्श्वगायकांची टीम कधीच बदलली नाही. त्यांच्या यशात टीमचा फार मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे. दादा कोंडके नऊ चित्रपट चित्रपटगृहात सलग 25 आठवडे चालू होते. या नऊ चित्रपटांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला. दादांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बँड सदस्य म्हणून आणि नंतर नाट्यअभिनेता म्हणून केली. बॉलिवूड कलाकारांमध्येही दादा कोंडके खूप लोकप्रिय होते.
दादांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत वादग्रस्त राहिले आहे. त्यांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केले होते आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटले होते की दादा आणि तिने कधीही लग्न केले नव्हते. 1967 पासून तिचा दादांशी कोणताही संपर्क नव्हता. तिला तेजस्विनी नावाची मुलगी होती जिचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. अनेकजण तेजस्विनी ही दादाची मुलगी असल्याचं मानतात. पण दादांनी त्यांच्या हयातीत तिचा स्वीकार केला नाही. Sunil Dutt: संजय दत्तचा काकासुद्धा होता अभिनेता; 22 चित्रपटांमध्ये होता हिरो; करिअर सोडून गावी करू लागला हे काम 14 मार्च 1998 रोजी पहाटे मुंबई येथील रामा निवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सुश्रुषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉ. अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशीच दादांची नियमित तपासणी केली होती. दादांचा मृत्यू झाला तेव्हा ते उषा चव्हाण यांच्यासोबत ‘जरा धीर धरा’ सिनेमात काम करत होते. त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत नेहमीच संभ्रम राहिला आहे. एका वृत्तपत्रानं याबद्दल म्हटलं होतं की, दादांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर समोर आले की, सुश्रुषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्यी घरी आणण्यात आले होते. तेव्हा असं नेमकं का करण्यात आलं हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. दादांच्या मृत्यूबाबत आजही चर्चा होते.